Wednesday, March 12, 2025

श्री

 श्री 


विचार ही वेगळी स्थिती आहे, असे अनुभव आणते. म्हणजे वेगळेपण, तात्पुरतेपण, चक्र, साखळी, बदल ह्या सर्व क्रिया आतून प्रकट होऊ पाहतात आणि त्या क्रियांमध्ये आपण किंव्हा भाव गुंतून राहतो. त्याचं एक स्वरूप म्हणजे विचार प्रकट होणे. 

विचार हे स्थळ आणि काळ आणि अनुभव किंव्हा भावना आणतात. जे विचार प्रकट होतात शक्तीमुळे, त्याने अस्तित्वाचे अर्थ निर्माण होतात. आपण होणे, वावरणे, जाणे हे अस्तित्व शक्तीमुळे होते, ज्याचा परिणाम "मी" असतो आणि चक्रात वावरतो. ही भगवंताची इच्छा. 

म्हणून कार्य त्याच्या अनुसंधानात करावे असे संत सांगतात. ते केल्याने जाणीव शुद्ध होऊ शकते. 

हरि ओम.



श्री 

 *कार्य असणे* हा अस्तित्वाचा गुण आहे. तसे पाहिले तर अस्तित्वाला तीन गुण आहेत - शक्ती, भाव आणि कार्य. हे तीन गुण एकाच साच्यात वावरतात आणि त्यावरून योगाचे प्रकार येतात. अस्तित्व शक्ती आणि जीव ह्या मध्ये वरील तीन गुणांच्या आधारे फरक असतो, म्हणून जीवाला अनुभव वेगळ्या प्रकाराचे येतात. आपला मार्ग योग करण्याचा आहे, जेणेकरून जीव शेवटी भगवत स्वरूप होतो. म्हणजे अस्तित्वाच्या गुणात जीवाचे परिवर्तन होते किंव्हा जीव त्यात विलीन होतो. 

म्हणून अभ्यास जो आहे, तो जाणिवेचा आहे, स्वतःचा आहे, कार्याची सत्य व्याख्या ओळखण्याचा आहे, शांत होण्याचा आहे, सत्य होण्याचा आहे, स्थिर राहण्याचा आहे. 

त्यासाठी नामस्मरण. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home