श्री
श्री
दृश्य जग _हालचाल_ म्हणून दिसते, अनंत गोष्टी घडणे, तात्पुरतेपण वाटणे, बदल वाटणे. ह्याचे मूळ साखळी सारखी क्रिया मध्ये आहे, जी सूक्ष्मापासून ते स्थूल स्थिती पर्यंत राहते आणि _भाव_ निर्माण करते किंव्हा जाणीव देते.
मन हे शक्तीचे चिन्ह आहे. प्रकट होऊ पाहणारी क्रिया मनाला वावरत ठेवते म्हणून तश्या वृत्ती, विचार, भावना, अनुभव प्रकट होऊ पाहतात आणि त्यातून _दृश्याशी संबंध_ जोडले जातात. _एकाच वेळेला_ साखळी, भाव, मन (मी), दृश्य, वेगळे वाटणे, अर्थ, प्रक्रिया ह्या साऱ्या गोष्टी निर्माण होत राहतात.
त्या चक्रात गुंतून राहिल्यामुळे स्मरण तसे टिकून ठेवतो आपण आणि तसेच संस्कार मनात घट्ट करत राहतो. दुसरे नाव त्याचे म्हणजे "माया". ह्या टप्पा पर्यंत येणे किंव्हा समजून घेणे हा ही प्रवास आहे. त्यातून पुढचा मार्ग शोधणे आले.
तो मार्ग म्हणजे नामस्मरण.
हरि ओम.
श्री
आपण काहीतरी विसरू आणि साखळी तुटेल सिद्ध होण्याची, अशी समजूत करून घेतल्यामुळे घाबरायला होते. मग ताबा, सिद्ध करण्याची क्रिया, अट्टाहास, बेचैनी अशा वृत्ती निर्माण होतात.
आपण क्रिया नाही साखळी नाही. अस्तित्व त्याच्याही पलीकडे असते. ते आपल्या आत असते, म्हणून ते कायमच आपल्या बरोबर येते. घडामोडी काहीही हो, आपण कुठेही जावो हालचालीत, परिस्थिती काहीही असो, भगवंत आपल्या बरोबर आहे, कारण तोच आपल्या रूपाला निर्माण करत राहतो.
त्याचेच चिंतन करावे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home