श्री
श्री
वासनेचे रूप किंव्हा उगम किंव्हा भाव हे गूढ प्रकरण असावं, कारण त्याने दृश्यात सरळ बौद्धिक उत्तर मिळत नाही. म्हणजे सर्वसामान्य स्थितीतून अनुभव घेताना, उत्तराची व्याख्या ही बौद्धिक चक्रावर आधारली जाते, म्हणून अट्टाहास, चिंता, त्रास, अहं ह्या गोष्टी त्यातून येऊ पाहतात आणि ते स्पंदने आतून प्रकट होत राहतात. उत्तर मिळवण्यासाठी त्यात स्वीकार, सैय्यम, शुद्ध होणे, श्रद्धेचा भागही तेवढा मौल्यवान असावा. त्यातून आतील परिवर्तन होऊन सत्य काय आहे ते उमगु शकते. उत्तर मिळणे म्हणजे परिवर्तन होणे आणि शांत राहणे. "मी म्हणजे काय आणि कोण आहे मी" ह्याचे उत्तर मिळणे म्हणजे भगवत स्वरूपात विलीन होणे. मीच न राहिल्यामुळे त्या संकल्पनेवरील स्थित साऱ्या गोष्टी विलीन होतात.
आता प्रश्न असा आहे, की हे कसे साध्य करावे? त्यात असे सांगणे आहे की नामस्मरण करावे. त्याचे महत्व एकदा पटले की त्या मार्गाच्या आड काहीही येऊ शकत नाही. साहजिकच तरीही मन अपेक्षा करते. ते ही बाजूला सारून, शुद्ध भावनेनं नामस्मरण करावे.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home