Friday, March 14, 2025

श्री

श्री 

संबंध किंव्हा स्पंदनाच्या साखळीतून अदृश्य ते दृश्य ही क्रिया काय असते आणि त्यात कुठले घटक आहेत, हे जाणून घ्यायला बुद्धी, भावना आणि कार्य लागते. स्पंदन भगवंताच्या अस्तित्वातून प्रकट होत राहतात आणि त्यामध्ये परिवर्तन घडून इतर स्थिती निर्माण होत राहते, रूप घेते, भाव आणते, जाणीव आणते, गुंतून राहते, वावरते आणि दृश्य वस्तू बरोबर संबंधित राहते. जे डोळ्यासमोर आहे, ते सर्व एका क्रियेतून निर्माण होते आणि त्यात आपण इतके गुंतून राहतो, की त्याला "खरे" मानतो आणि त्याचा परिणाम भोगतो. मूलतः सर्व साखळी आणि प्रवाह आहे - pattern. ते तसे वाटत नाही आणि बदलणारे, तात्पुरते, वेगळे वाटते ह्याचाच अर्थ की त्या स्पंदनाचा आपल्यावर खूप परिणाम झाला आहे. 

ती धुंदी उतरवण्यासाठी नामस्मरण हे एकमेव औषध आहे. भगवंताची जाणीव आत्मसात करा. 

हरि ओम.


श्री 

परिणाम कसे होतात आणि आपण कसे गुंतून राहतो, ह्याने चिंता किंव्हा विषय करून काही उपयोगाचे ठरत नाही. स्वतःला विलीन करणे, म्हणजे भगवंताचे दर्शन होणे, हे ध्येय आहे. कितीतरी गोष्टी बाधक ठरत राहतात  - विशेषतः आपली बुद्धी चक्र. जर तर या परिभाषेत सतत वावरल्यामुळे, सत्य किंवा श्रद्धेची शक्तीचा अंदाज येणे अवघड होते. बुद्धी चक्राला शांत करणे पहिली गोष्ट आहे. ते होत राहताना इतर अवलंबून असणाऱ्या गोष्टी देखील शांत होतात. 

म्हणून शांत होणे ही क्रिया गूढ आहे. आपण नाम घेत राहणे. त्यावर श्रद्धा वाढवत ठेवणे होय. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home