Wednesday, March 19, 2025

श्री

श्री 

निर्माण होत राहणे, साखळी असणे, एकात एक रूप प्रकट होणे, बदल होणे, पसरणे, वावरणे, घटने, विघटन होणे, एकत्रित होणे - ह्या सर्व क्रिया अस्तित्वाच्या शक्तीने साकार होत राहतात. त्या क्रियांचे बीज वासनेत असल्यामुळे, तशी ढवळाढवळण आपणही अनुभवतो आतल्या आत. त्या गुणामुळे दृश्याशी संबंध जोडले जातात आणि त्या भावनेतून आपण वावरत राहतो. दृश्यात असणारे ढग काय, समुद्र काय, वाळू काय, झाड काय, मुंगी काय आणि मी काय - बीज एकच आहे. ढग आले आणि गेले पण आकाश तसंच स्वच्छ राहत. तसे वृत्ती आणि आकार किंव्हा साखळी असतात, वावरत राहतात, बदल पावतात आणि निघूनही जातात, पण शुद्ध माध्यम तसंच राहत. शक्ती भगवंताचीच आहे, तीच सर्व जग चालवत राहते. तिच्यातून अनंत पदार्थ घडतात आणि मोडतात आणि परत प्रकट होतात. तो त्या शक्तीचा गुण आहे आणि त्याला आपण "नाम" असे म्हणतो. 

पदार्थ कुठून आला आणि त्याचे रूपाचे घटक कोणते आणि ते कसे निर्माण झाले, हे विचारण्यात काही विशेष तथ्य नाही. सारे प्रवाह असेल, तर पदार्थ केव्हाही, कुठेही, कसेही होईल...ते शांत होऊन बघणे. बदल कधीही होईल, रूप कसेही असेल, अनुभव कसाही येईल. आपण विचलित होऊ नये, कारण कार्य करणारा तो आहे आणि त्याच्या इच्छेतून आपण होतो. त्याची इच्छा, म्हणून आपण आहोत आणि कार्य करतो. 

सर्व स्वीकारावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home