श्री
श्री
मला काय वाटत आहे, ते सांगून किंव्हा करून मोकळे व्हावे. ते सरळ नसेल, वाकडे असेल, त्यात बरीच संकल्पना असतील, बदल असतील, गुंतागुंती गोष्टी असतील, विषय असेल, संबंध असतील, चिंता असेल, त्रास असेल, भावना असेल...काहीही असो, ते सांगणे, कार्य करणे, भगवंताला शरण जाणे, त्याचे स्मरण ठेवणे. त्याचा विचार कसा राहील, ते ध्यानात घेणे. मग हे लिहिणे जरी निमित्त झाले, त्रास जरी निमित्त होत असले, तर मग तसे होऊ देणे.
लिहित असताना संबंध रेगे सारखे वाटतात. प्रत्यक्ष विचार प्रकट होताना बऱ्याच दिशांत मधून रूप, आकार, कार्य, हेतू, संबंध निर्माण होत राहतो. म्हणून लिहिण्यात, बोलण्यात, ऐकण्यात, कार्य करण्यात नेहमी थोडा फरक राहणार. त्या फरकाला त्रास मानून न घ्यावे आणि हे नैसर्गिक आहे, हे ओळखणे. म्हणजे भगवंत सर्वांगीण पद्धतीने ओळखावा लागतो किंव्हा जाणिवेत आणायला लागतो. किंव्हा जाणीव क्रिया सर्वांगीण, सर्व स्तरात, सर्व स्थितीत, सर्व रूपात पसरलेली असते, ती फक्त विचारात नसते. म्हणजे जिवंत प्रकरणाला बरेच रूप आणि साखळ्या असतात - सूक्ष्म रूप ते स्थूल रूप - सर्व भगवंत दर्शवत आहेत असे संत ज्ञानेश्वरांचे सांगणे आहेत _(7,5,3 दशकांचा मेळा, एकत्तवी कळा दावी हरि)_ म्हणून जाणीव स्थिर होऊ देणे, ह्याला सर्व पद्धतीने आत्मसात होऊ द्यावे लागते. त्यासाठी वेळ द्यायला लागतो. म्हणून सत्य काय आहे, हे जाणवायला लागते, अनुभवायला लागते - ते बोलून सुरुवात केली असते.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home