श्री
श्री
वृत्ती खूप खोल ठिकाणी असते, जी परिणाम करते पण दिसत नाही. ह्याचा अर्थ की परिणाम सूक्ष्म प्रकृतीतून उद्भवतात, एका साखळी प्रमाणे आणि त्याच्या रूपात फरक होत जातो - अदृश्य आणि शांत स्थिती ते दृश्य आणि अस्थिर.
म्हणून सर्व दिसणाऱ्या गोष्टींचा उगम अदृश्यातून होत राहतो आणि अदृश्य इच्छा कारण बनते रुपात येण्यात. म्हणून गोष्टींचे किंव्हा वृत्तीचे घडामोडी स्पष्टपणे बुद्धीला उमगत नाही, आणि कदाचित हे नैसर्गिक आहे, म्हणून श्रद्धेला स्थान निर्माण होते.
हा नियम किंव्हा हा मार्ग सगळीकडे अभिप्रेत आहे, कुठल्याही स्थळात आणि काळात आणि क्रियेत.
मी ह्या संकल्पनेवर सुद्धा श्रद्धा ठेवायला लागते - आपले होणे, वावरणे, अनुभव येणे, निघून जाणे, काहीतरी वाटत राहणे, अर्थ निर्माण होत राहणे, कृती करणे, परिणामांना सामोरे जाणे - हे सर्व श्रद्धेने ओळखणे.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home