Wednesday, March 26, 2025

श्री

 श्री 


दृश्याबद्दल काहीही वाटणे ही आपल्याच मनाच्या _स्थितीचे प्रतीक_ आहे. ते प्रतीक गुंतलेले, क्रियाशील आणि बदलणारे असते, म्हणून अस्थिर असते. हा झाला अनुभव आणि त्यातून होणारे निर्णय, म्हणजेच चक्र. 

अनंत रूपे येऊ पाहतात, गुंतून राहतात, भासतात आणि निघून जातात. येणे आणि जाणे ही क्रिया कायम राहते आणि त्याला चालना देणारी शक्ती आणि त्यातून होणारे परिवर्तन आहे *नाम*. 

नाम आपल्या बरोबर कायम असते, आपण तिथून आलो आहोत आणि तिथे जाणार आहोत. दृश्य जग ही मधली स्थिती आहे, जिथे भाव आणि अनुभव हे घटक बघायला मिळतात जीवाला. जीव कायम नाही, त्यावर कुठलीच गोष्ट कायम नाही किंव्हा सत्य नाही. म्हणजेच ती तात्पुरती, निर्माण झालेली आहे. म्हणजे हा सर्व देखावा आहे, ज्याला टीका न करता, शांत मनाने स्वीकारावा लागतो. 

तो देखावा रेघ म्हणुन आढळेल, कधीतरी चक्र म्हणून, कधीतरी जाळ म्हणून (म्हणजे कुठलेही रूप घेऊन) आणि तसे आढळण्यास आपल्यावर परिणामही करेल किंवा कार्य करायला भाग पाडेल. देखावा आणि भाव हे एकाच प्रवाहाचे गोष्टी आहेत. 

प्रवाह हे भगवंताचे कार्य आहे. कार्य म्हणलं तर ते कायम राहणार. 

प्रवाह शांतीतून प्रकट होतो. प्रकट होणे म्हणलं, तर त्या कार्याला हेतू नसतो, तो त्या असण्याचा गुण धर्म आहे, म्हणजे तसे होणे आहेच. 

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home