श्री
श्री
गोष्टी बदलत राहतात, त्यातच आपले भले आहे. दररोज आपल्याला एक कोरी पाटी हातात येते, कोरे संबंध, कोरी साखळी, कोरा क्षण, कोरा अनुभव. म्हणजे तसे पाहिले तर सर्व कोरच असतं, निरहेतू, स्वच्छ, शुद्ध, कायम, स्थिर. म्हणजे जीवनाला ही छटा आहे, जी आत्मसात करायला हवी.
पूर्वीचे संबंध, वासना, साखळी आणि गाठोडे घेऊन आत्ता निर्माण होऊ पाहणारा नवा क्षणात आपण रंग भरतो आणि त्यात गुंतून राहतो. तो रंग कायम राहील, अशी समजूत आपण धरून ठेवतो, पण परिस्थिती बदलत असल्यामुळे तो रंग टिकवण्यासाठी खूप आटापिटा करायला लागतात. इथेच दुःख निर्माण होतं.
रंग म्हणजे "मी" ही समजूत स्वतःला त्रास देणारी आहे, हे मान्य करायला हवं. रंगाचा आभास होणे, हे विधिलिखिन आहे, पण त्याला धरून राहणे हे तापदायक आहे, कारण रंग निर्माण करणे, होळी खेळणे हे दैवी कार्य आहे, माझ्या स्वाधीन मुळीच नाही! ज्या रंगला "मी, मी" असे म्हणतो, तो रंग कोण देतो आणि कोण बदलत ठेवतो आणि कोण काढून ही घेतो?!
_नवा क्षण_ म्हणजे स्थिर स्थिती सतत अनुभवणे, शांत होणे, सत्यात राहणे, कुठल्याही रूपाला न धरून ठेवणे, श्रद्धेने जगणे, प्रतिभा शक्ती आत्मसात करणे...
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home