श्री
श्री
विचारां बद्दल काही गोष्टी मांडू शकतो...
दृश्यात, जन्मो जन्मी, संबंधांचे वावरणे, साखळीत अवतरणे, रुपात येणे आणि कार्य करायला भाग पाडणे, हे भगवंताच्या इच्छेतून होते. म्हणून परिस्थितीच्या रूपा बद्दल शंका घेऊ नये आणि शंकेतून मूळ शोधण्याचा प्रयत्न करू नये. भीतीपोटी, जे बऱ्याच वेळेला बुद्धीचा वापर तसा केला जातो, त्याने मूळ हाथी लागत नाही. आणि जे काही मूळ आहे, ते आहे सत्य आणि शांत होण्याचं. त्यात परिवर्तन अभिप्रेत आहे आणि त्याग देण्याचं. बुद्धीचा स्वभावही सोडायला हवा, त्याच्या पलीकडे जायला हवे, म्हणजेच श्रद्धेला योग्य ते स्थान द्यावे.
घाई करून किंव्हा पळून जाऊन किंव्हा कृती करून किंव्हा खूप कष्टी होऊन उपयोगाचे नाही. त्यातून उलट असे काही संस्कार होऊ पाहतात की अजूनच वृत्ती मनाला घट्ट चिकटून राहतात! म्हणजे सत्य ओळखणे हे श्रद्धा आणि कृपेच्या मार्गानेच कळेल. योग्य वेळ आली, की भगवंत दर्शन देईल.
कोडी सोडवण्याचा अट्टाहास करू नका. आपण कृती ह्यासाठी करतो की भगवंत कळवा, आपण सुखी होऊ ह्यासाठी नाही. म्हणजे भगवंत विषय नाही. भगवंत कळणे, म्हणजे सर्व विषय, गुंतणे, वावरणे पूर्णपणे शांत होणे.
विषय नाशवंत आहे. म्हणजे आपण त्याला मुल्य देतो, म्हणून विषय निर्माण होतात आणि मनाला गुंतून ठेवतात. विषयाचे मूळ दृश्यात कदापि नाही आणि सर्वांचे मूळ शांत होण्यात आहे. तसे पाहिले तर "मूळ" ह्या संकल्पनेवर इतका भर आपण देतो, की त्यामुळे त्रासच होतो स्वतःला.
दृश्याने आपण ठरत नाही. काहीही केल्यामुळे किंव्हा न केल्यामुळे आपण ठरत नाही. विचाराने आपण ठरत नाही किंव्हा कुठल्याही रूपात आपण ठरत नाही. माझे रूप निर्माण होते, म्हणून त्यावर संबंधित रूपे निर्माण होतात. जे दिसते किंव्हा अनुभवात येते, ती एक अस्तित्वाची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचं स्थान असतं. तसंच शांत असण्याचंही स्थान असत.
वरील पार्श्वभूमीवर _निर्णय_ घ्यावा लागतो. निर्णय ही देखील संकल्पना आहे अस्तित्वात असलेली. ती प्रकट होऊ पाहणार.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home