Friday, March 28, 2025

श्री

 श्री 


सर्व क्रिया, त्याचे सर्व घटक, साखळीचे स्वरूप, संबंध जोडण्याची क्रिया, रूप, आकार हे सर्व जाणिवेवर, अस्तित्वाच्या शक्तीवर अवलंबून आहे. हे मला विचारांच्या पार्श्वभूमीवर कळते, प्रत्यक्ष व्यवहारात आणताना बऱ्याच क्रियांचा समावेश होणे गरजेचे आहे. त्यातून परिवर्तन घडते आणि सर्वांगीण अनुभव प्रकट होतो. म्हणजे ज्याला आपण अनुभव मानतो, तो खूप साऱ्या घटकांमधून, साखळीतून, सूक्ष्मापासून, येत असतो (तो फक्त बौद्धिक नाही). 

ह्याचा दुसरा अर्थ असा की बुद्धीला मर्यादा नाही. शुद्ध जाणिवेला मर्यादा आले, की बुद्धीची शक्ती प्रकट होते. बुद्धीच्या शक्तीच्या मर्यादा शिथिल केले, वाढवले, शांत केले की शुद्ध जाणीव होते. प्रत्येक घटकेला मर्यादा किंव्हा आकुंचित कवच म्हणू शकतो. त्यातून त्याचा स्वभाव किंव्हा गुण धर्म प्रकट होतो आणि त्या पद्धतीतून ते दृश्याशी भिडतो. त्या अर्थाने "दृश्य" हे काल्पनिक प्रकरण आहे, सत्य नाही. अस्तित्वाच्या शक्तीवर जर मर्यादा घातले तर त्या शक्तीचे _रूप_ किंव्हा क्रिया दिसून येते किंव्हा भासते आणि त्याचे "मन" होते, जीव होतो, स्वतःवर विचारांचा परिणाम होतो, भाव होतो, "मी" होतो. ह्याला "घसरणे" असे ही म्हणतात. 

असो, घसरलो तर घसरलो! ते का, माहीत नाही. माहीत जर असते, तर घसरण्याचा प्रश्नच आला नसता! आत्ताच्या क्षणापासून जाणीव शुद्ध करणे हा हेतू बाळगणे, म्हणजे मार्गावर चालू लागणे. 

त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home