Thursday, April 03, 2025

श्री

 श्री 


श्री द्न्यानेश्वर म्हणतात की भगवंत असा भाव आहे की दही घुसळून लोणी काढण्या प्रमाणे आहे.

ह्या दृष्टांताचे बरेच अर्थ निघून येतात. 

एक म्हणजे लोणीला वेगळया प्रमाणे (वेगळा भाव) बघितले तर ते दही वाटते. किंव्हा दहितच लोणी असते (शांती भाव दृश्यात असतोच). काही प्रयासाने ते लोणी बाजूला करायला लागते (मनाचे संस्कार आणि अभ्यास).

 _दही_ म्हणजे अनेक वेगवेगळ्या वस्तू दिसत राहणे. त्यातील सत्य किंव्हा एकमेव परम तत्व म्हणजे _लोणी_ . ते परम तत्व जाणवायला लागते, तशी स्वतःची नजर व्हायला लागते. मला वाटतं की phenomenology, philosophy, culture हे शास्त्र एका प्रकारे तशी जाणीव निर्माण करते. म्हणून त्या शास्त्राचा अभ्यास महत्वाचा ठरू शकतो. 

दह्याला महत्व दिले तर ते दिसत राहील. म्हणजे तिथे विवेक बुद्धी वापरून त्यातच लोण्याचे संबंध किंव्हा अस्तित्व निर्माण करायला लागते. एकदा ते झाले, की दही दिसत नाही आणि जे दिसते ते म्हणजे फक्त लोणी. म्हणून भाव तो जीवाचा असेल किंव्हा भगवंताचा. भगवंत कळून घेण्यात जीवाच्या भावाचा त्याग आहे.

म्हणजे जी वस्तू (दही) भावते किंव्हा दिसते ती अदृश्यापासून (लोणी) ते दृश्य (दही) पर्यंतची साखळी दर्शवते. किंव्हा दही दिसण्यामध्ये लोण्याचा अस्तित्वाचा समावेश आहे. दही होण्याचे _कारणच_ लोणी आहे.

लोण्या पर्यंत जाण्यासाठी मार्ग असावा. जाणीव प्रखर करण्यासाठी काहीतरी खटपट आवश्यक आहे. त्याचं चिंतन करावं. 

दह्यात लोणी दिसून येणे म्हणजे अनेकपणात एकमेव तत्व जाणवणे.

 _मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया तू दुर्गामा न घाली मन_ 

आपल्या समजुतीला ज्या गोष्टी क्लिष्ट वाटत असतात, त्याच्या नादी लागू नये, कारण ते बाधक ठरू शकेल. भगवंत _सहज साध्य_ व्हायला हवा. In the most natural way.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home