श्री
श्री
आपल्याला जे जाणून घ्यायचे आहे किंव्हा जाणीव प्रकट होऊ द्यायची आहे, ती आहे अस्तित्व _माध्यमाची_. त्या माध्यमाचे कार्य काय (pattern), ते कसे क्रिया करते, क्रियेत कोण कोणते घटक प्रकट होतात, त्याने साखळी कशी निर्माण होते, त्याचा परिणाम कसा असतो आणि त्यावरून प्रत्येक स्थितीचा भाव आणि जाणीव काय होऊ पाहते, ती दृश्याशी संबंधित कशी राहते, दृश्याचे रूप कसे घडवते, स्मरण कसे निर्माण करते, अहं वृत्ती कशी बनवते, त्यात आपण (आपली शक्ती) कुठल्या चक्रात वावरत राहते - हे सर्व जाणणे आहे.
आपण चक्राला (pattern), ह्याला "धरून" असतो - त्याच्यावरून निर्माण होणारा भावाला "खरे" मानतो, तिथे मन चिकटून राहते आणि ज्या संकल्पना ते निर्माण करते त्यात आपण वावरत राहतो. हे सर्व काही करणारा (मूळ तत्व) कोण आहे, इथे आपल लक्ष जात नाही किंव्हा ते कळून घेण्याची तीव्र इच्छा आणि प्रयत्न आपल्या हातून घडत नाही. म्हणून जन्म आणि मरणाच्या अनंत चक्रात आपण वावरत राहतो.
थोडक्यात शोध जो आहे, तो अस्तित्व माध्यम ओळखण्याचा आहे, तशी जाणीव होण्याचा आहे, परिवर्तन करण्याचा आहे, शांत होण्याचा आहे.
लोकांची बडबड, विचारांची सतत वावरणारी साखळी, मनाच्या हालचाली, प्रकट होणाऱ्या वासना - कुठल्या ना कुठल्यातरी घटकेत आपला भाव गुंतलेला असतो. म्हणून त्यावरून आपण स्वतःची व्याख्या, अर्थ, क्रिया, कोडी सोडवण्याची धडपड, विशेषतः प्रक्रिया _देत_ राहतो. गोष्टी त्याने थांबत नाही. कुठल्याही घटकेत _संकल्पना_ आहे आणि संकल्पनातून होणारे क्रिया, भाव, चक्र, संबंध ते सुचविते. म्हणून संकल्पना शेवटी शांत व्हायला हवी.
इथे संकल्पना, जाणीव, भगवंत एकाच अर्थाने शब्द वापरले गेले आहेत. जेव्हा हे तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात, तेव्हा भगवंत, मी, अस्तित्व एकच होतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home