श्री
श्री
अस्तित्वाची सत्य स्थितीची जाणीव होणे हे नैसर्गिक ध्येय किंव्हा प्रगती मानली हवी. त्या मार्गात अर्थात जे रूप होऊ पाहतील, त्याला समाधानाने स्वीकारावे लागते.
दृश्य ही स्थिती आहे, जी सत्यातून, शांती भावनेतून, स्थिरतेतून प्रकट झाली आहे. प्रकट शब्द खूप मोठा आहे आणि गूढ आहे. त्यात अनेक स्तर, साखळी, हालचाली, गतींचा समावेश होत असतो. त्यातील एक रूप म्हणजे आपण. अर्थात हा सर्व प्रकार आकाराचा गुंतागुंतीचा असणार, ह्यात शंका नाही आणि तो परिणामही करू पाहणार.
सर्व _कार्य_ भगवंताच किंव्हा अस्तित्व शक्तीचे आहे. भगवंत आहे, म्हणून दृश्य जग आहे, आपण आहोत, बदल आहे, साखळी आहे, स्तर आहे, येणे आहे, जाणे आहे, क्रिया आहे, भाव आहे, जाणीव आहे. इथे "आहे" म्हणजे existence or apriori किंव्हा त्या असण्याला कुठलाही हेतू असत नाही, तो नुसता असतो.
म्हणजे सर्व संकल्पनांच्या आणि हेतूच्या पलीकडे जी स्थिती वावरते, असते, तिला भगवंत म्हणतात. तशी जाणीव स्वतःची झाली की भगवंत स्वतः मध्ये प्रकट होतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home