Sunday, May 11, 2025

श्री

 श्री 


प्रत्येक जीव, _आपण_ , कसले रूप घेऊन येतो, त्याची चिंता करू नये. आपण खूप साऱ्या स्थितीतून आलो आहोत, बदलणार आहोत आणि परिवर्तित होणार आहोत. 

असू द्यावे सगळे. अर्धवट स्मरण असू द्यावे आणि त्यातून जे अनुभव येत आहेत, ते येऊ द्यावे. टीका स्वतःसाठी असते, दुसऱ्यांसाठी नाही. चिंता असणार. ते येऊ द्यावे. सर्व येऊ द्यावे. समजून घेणे की काय येत आहे, काय वावरत आहे, काय निघून जात आहे. 

असू द्यावे बोलणे किंवा न बोलणे. असू द्यावे अनेक स्थिती. असू द्यावे खूप अवघड प्रश्न आणि गुंता. असू द्यावे गाठी. असू द्यावे प्रयत्न आणि सैय्यम. असू द्यावे सर्व काही. असू द्यावे हालचाली. असू द्यावे सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. असू द्यावे कडक उन्हाळा, पावसाळा आणि थंडी.  असू द्यावे चढ आणि उतार. असू द्यावे गुदमरणे आणि मोकळे होणे. असू द्यावे वेग आणि स्थगिती. असू द्यावे दोष आणि गुण. असू द्यावे आपुलकी आणि एकटेपणा. 

असू द्यावे सर्व काही.

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home