Thursday, May 08, 2025

श्री

 श्री 


सर्व दृश्याचे रूप आणि आकार माझेच छटा आहेत, इथे येतील, इथून जातील, आतून परिवर्तित होतील. माझ्या बाल्कनी मधला दरवाजा उघडला की ऊन, वारा, आकाश, हिरवळ, ढग सर्व गोष्टी संबंधित येतात आणि बोलावत राहतात. 

तसंच, सर्व रूप, आकार, प्राणी जात आपल्याला बोलावतात. त्यांच्याशी आपण संबंधित कायमच राहतो, कारण ह्या परिस्थितीत कुणीही वेगळ नसतं. अस्तित्व शक्ती ही एक क्रिया (pattern) आहे, ज्याचा प्रभाव थेट स्मरणात आणि संकल्पनेत उमटतो आणि तो "भाव" म्हणून ओळखला जातो आपल्याकडून. त्या क्रियेची जाणीव ज्या पद्धतीने होते, त्या पद्धतीचे परिणाम आपल्याला येतात. म्हणून प्रत्येकाला तीच क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने दिसते आणि अनुभवात येते. 

सांगण्याचे तात्पर्य हे, की संबंध सर्व रुपांशी कुठले असते नेमके, हे ओळखावे. गोष्टींचे होणे, येणे, वावरणे, जाणे हे असतेच. त्यात कितीही चिकित्सा केली, इतिहास पाहिला, उद्याची तैयारी करत बसलो, तरीही सत्य हेच की ते सर्व रूप आपल्याच अंतःकरणातून आले असतात, ते आपलीच हाक आपल्याला देतात, आपल्याला बोलावतात, आपण त्यांचे देणे लागतो, आणि आपलेच प्रतिबिंब जाणवून देतात. 

म्हणून शांतीने वावरावे.

हरि ओम.



श्री 

 *शांती आहे* , दृश्य आहे, क्रिया आहे, संबंध आहे, _म्हणून_ आपण _असतो_ आणि त्या असण्यामुळे विचार येऊ पाहतात. त्यात काही जाणीवा होऊ पाहतात, भाव असतो, भावना होतात, क्रिया करण्याची गरज भासते वगैरे. 

 *असणे* ही वस्तुस्थिती "मी होण्याचीही" अगोदर आहे, म्हणून माझ्या वावरण्याला असण्याचा पाया आहे, त्या शक्तीचे कार्य आहे, संबंध आहे, परिणाम आहे. Present continuous tense.

संबंध असण्यामुळे कायमचे आहेत. संबंध असण्यामुळे प्रचितीला येतात. संबंधातून सुटणे किंव्हा पळून जाणे हा वेडेपणा ठरतो. तसे काही प्रगत देशाने तशी भूमिका गाजवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातून हे उमगते की तसे केल्याने माणूस आणखीनच विघटित, बेचैन, कष्टी, एकटा आणि एकलकोंडा झाला आहे. 

म्हणून प्रकरण काय आहे, ते आत डोकावून बघावे. प्रश्न सोप्पे नाहीत, आणि म्हणून अभ्यास आणि मार्ग आणि सैय्यम असावा. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home