Sunday, May 18, 2025

श्री

श्री 

अनेक विचार...

ठासून भरून गोष्टी करत राहणे योग्य आहे का, हे स्वतःला विचारावे. खूप केल्याने वासना तृप्तीकडे जातात का, हे ओळखावे. तृप्त होणे म्हणजे सूक्ष्म, अदृश्य, समाधानी भाव संक्रांत होणे. हे वासना पुरवून होते का? वासनेला चिकटून किंव्हा धरून तृप्त वाटते का? वासना आणि अस्तित्व वेगळे असते का, म्हणजे पहिले काय असते आणि नंतर काय येते, कशातून येते आणि रूप होत असताना आणखीन कोणते रंग चढतात हे ओळखावे. 

तर असे दिसून येईल की रूप धारण करताना किंव्हा दृश्यात येताना किंव्हा दृश्य अनुभवताना अस्तित्व शक्तित बरेच, असंख्य, साखळीतील स्तर चढतात. त्याला कांद्याची उपमा देता येईल आणि अनेक रूपांचे कवचे धारण करून शेवटी एक दृष्टीला भासण्यासारखे आकार दिसून येते. 

म्हणून सर्वात शेवटचे, बाहेरचे, बदलणारे, परावलंबी कवच आहे ते आपले जग आणि देहाची जाणीव. त्याला स्थूलपणा सर्वात अधिक. 

सर्वात आतील सूक्ष्म स्थिती म्हणजे भगवंताची शुद्ध शक्ती किंव्हा त्याच्या अस्तित्वाची जाणीव. ती शक्ती असते _म्हणून_ सर्वात बाहेरचे कवच दिसते किंव्हा निर्माण होते. बाहेरील कवच ह्याला तसे स्वतंत्र अस्तित्व अजिबात नाही. म्हणून त्याला तात्पुरते मूल्य, वेगळेपण असते. तो त्या कवचाचा गुण धर्म आहे. 

Each of such _layers_ mean boundaries and potentials to transcend those. So there is a tendency to continue as a boundary or to transcend it...always. One can choose to engage oneself in transcendence and penetration of all layers or to keep identifying with some layer. Choice is ours. And the right choice can come from awareness. 

हरि ओम.


श्री 

भीती कदाचित अशी असते की एखादा विचार किती विस्तारू शकतो आणि कुठे नेऊन पोहोचू शकतो आणि ते करत असताना कोणता परिणाम पडेल स्वतःवर?! In a way, this is a _critical_ engagement having skepticism, doubt as some of its ingredients. हे केल्याने कधीतरी महत्वाचे प्रश्न असे येऊ शकतात की - दृश्य म्हणजे काय, ते कसे होते, ते कोण निर्माण करते, मी म्हणजे कोण, मी कुठून येतो, मला कशाची भीती असते, भीती आहे तरी काय, ती कशी घालवावी, मी परिस्थितीत का गुंतून राहतो, संबंध म्हणजे काय, पळून जाणे योग्य आहे का, ह्या प्रश्नांचे उत्तरे कसे संपादन करावे, शांत होणे म्हणजे काय, शांती संक्रांत कधी होईल, भगवंत म्हणजे काय, नामस्मरण का करावे, श्रद्धा म्हणजे काय, प्रतिक्रिया म्हणजे काय, सुरुवात कुठून करावे, केलेले कार्य योग्य आहे का?....

एकंदरीत ह्याला शक्तीचे जागे होणे असे म्हणू शकतो किंव्हा भगवंताची कृपा होते म्हणून प्रश्न पडतात असे म्हणू, किंव्हा स्वतःचे प्रयत्न चालू ठेवणे असे म्हणू. 

प्रश्न पडणारच आणि शोध हा घेतला जाईलच. तो मार्ग निवडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार भगवंताने दिलेला आहे. त्यासाठी स्वतःला सिद्ध करणे हे आपले ध्येय अजिबात नाही, असे मला वाटते. भगवंत आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी निवडलेला मार्ग असू नये. तो शोध स्वतःने स्वतःसाठी घ्यावा. दृश्य काय आहे आणि त्याचे कोणते घटक असावेत हे स्वतः जाणून घ्यावे. इथे फक्त एक मी असतो, दुसरा कुणीतरी वेगळा असणे हा भ्रम आहे. 

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home