श्री
श्री
एखादा बिंदू (रूप, विचाराचे घटक, भावना, वासना) सिद्ध करण्यात कष्ट होतात. त्याला पकडून राहता येत नाही आणि सिद्ध होणे, ह्याला तर आपण स्वतःचा हेतू मिसळतो, म्हणून त्रास होतो.
गोष्टींचे रूपात येणे, होणे, वावरणे, बदल होणे, हालचाल दिसणे, जाणे हे सर्व _स्वतः सिद्ध_ प्रकार आहे - म्हणजे अस्तित्व माध्यम असल्यामुळे, त्याचा _परिणाम_ होणार, आणि तो परिणाम म्हणजे ज्याला _क्रिया_ म्हणू आणि त्या _क्रियेतून_ होऊ पाहणाऱ्या असंख्य गोष्टी, संबंध, रूप, आकार, साखळी, भाव वगैरे. ह्यामुळे *स्मरण* प्रज्वलित होते, जो जाणिवेचा अंश आहे. Awareness leading to memory of existence.
सर्व घडामोडी स्वप्नात किंव्हा हवेत होतात... similar to touching a smart screen. आपण अस्तित्वाचा अंश म्हणून होतो (एक बिंदू) म्हणून एक संबंध, वासना, भाव, साखळी धारण करतो आणि त्या प्रकारे क्रिया करतो. जसे आपण बिंदूचे स्मरण ठेवू, त्या स्मरणाच्या पोटी सर्व सृष्टी अनंत बिंदूचा साठा अशी दिसते. इथे "दिसणे" म्हणजे जशी वासना, तसे इंद्रियांच्या क्रियाना मुल्य दिले जाते आणि त्या प्रकारे परिणाम आपण अनुभवतो. म्हणजे इंद्रियांच्या हालचालींना जी शक्ती उत्तेजीत ठेवते, ती वासना समजावी.
तात्पर्य - दृश्याशी संबंध आतील स्थितीमुळे निर्माण होतो. ती स्थिती शुद्ध केली, की जग देखील सूक्ष्म दिसते/ सूक्ष्म होते.
स्थूल किंव्हा सूक्ष्म, जेवढा क्रियेचा, रूपाचा, आकाराचा भाग आहे, तेवढा भावनेचाही असावा. भावनांचे रूप बिंदू म्हणून वेगळे असते आणि भगवंत म्हणून वेगळे होते. आपुलकी, प्रेम, सैय्यम, शांती, श्रद्धा, दान, आदर ह्या भावना मध्ये आपण स्थिरावू शकतो, ध्यानात आणू शकतो अभ्यासामुळे, अनुभवाच्या मार्गात जाताना.
ह्याचाच दुसरा अर्थ की भगवंत आपल्या पाठीशी आहे आणि जे काही आपण अनुभवतो, त्याची सुरुवात आणि शेवट एक शुद्ध आणि सूक्ष्म स्थिती आहे, म्हणून ती हेतूच्या *पलीकडे* स्थित असते. तिथे हेतू ही क्रिया पोहोचू शकत नाही, किंव्हा हेतूच्या भाषेत शुद्ध स्थिती समजून येत नाही. म्हणूनच एका पद्धतीने स्वतःच्या हेतुने भगवंत जाणून घेता येत नाही. हेतूचे त्याग केले किंवा ते सोडले तरच भगवंत आपल्यात प्रकट होतो. हेतूचे त्याग करणे म्हणजे स्वतःच्या भावाचे त्याग करणे, म्हणजे "मी" ही संकल्पना शांत होणे, विलीन होणे. आणि "मी" चे त्याग करणे म्हणजे जीवाच्या स्मरणाचे त्याग होणे, अनुभवाचे त्याग होणे!
गोष्टी, अनुभव, संबंध, वासना, स्थिती कुठून येतात, कसे येतात आणि कुठे जातात, ह्याची चिंता करू नये. ह्या गोष्टी स्वतः सिद्ध आहेत, म्हणजे त्यांचे रूपात येणे आणि निघून जाणे हे विधिलिखित आहे. म्हणून आपलेही होणे आणि निघून जाणे विधिलिखित आहे. ह्या गोष्टीला शांतपणे स्वीकारणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home