Sunday, June 08, 2025

श्री

 श्री 


नाम हे सर्व घटकांशी, कार्याशी, स्थळाची, काळाशी आपुलकीचे _संबंध_ जोडतो. जाणीव शुद्ध होते आणि ती सूक्ष्म झाल्यामुळे विस्तार पावते, म्हणजे की सर्व प्रकारचे चक्र, क्रिया, भाव त्या जाणिवेतच सामावतात. हा प्रकार "गोळा बेरीज" करण्याचा नाही आहे, किंबहुना त्या भाषेच्या पलीकडचा आहे. सामावणे म्हणजे सूक्ष्म होऊन शांती अनुभवणे. 

भगवंताच्या अस्तित्वातून, शक्तीतून "आपण" की संकल्पना वेगळी नाही. वेगळे वाटणे हा मानसिक भ्रम आहे आणि त्यामुळे अनंत परिणाम आपण ओढून घेतो स्वतःवर. 

कार्य करणे भाग आहे. मग प्रत्येक व्यवहार नाम घेऊन केलेले उपयोगी ठरेल. कारण त्याने स्मरण राहील की कार्य कशासाठी आणि कुणासाठी केले जाते. संबंध आपुलकीचे होण्यासाठी कर्तव्य करणे भाग आहे, सर्व कार्य करणे महत्वाचे आहे. जे भोग असतील आणि ज्याला सामोरे जायला लागेल, ते करायला लागेल, शांत राहून. त्यातूनच कुठल्याही क्षणी आपुलकीचे संबंध येतील, प्रतिक्रिया उमटणार नाही, शांतीत स्थिरावले जाऊ, निरहेतू होऊ. 

 _संबंध_ प्रकार अस्तित्वाची क्रिया आहे. म्हणून सर्व काही जाणिवेशी निगडीत असते. सत्य जाणणे हे आहे, की जाणीव शुद्ध शक्तीची व्हायला हवी. 

तो अभ्यास नामस्मरणाने होत राहतो.

हरि ओम.




 श्री 

मनात येणारे विचार संबंध जोडतात दृश्याशी आणि ते बोलून दाखवायला हवे नेहमी असे नाही. बोलणे सहज व्हायला हवे. सहजता हेतू नसल्यावर येते. मग जाणिवेतून हेतू मावळला तर कुठलीही क्रिया सहज होते. बोलणे सहज का होत नाही, ह्याचा पाठीमागचा विचार करावा आणि बघावे की त्याच्या आड कुठली वृत्ती येते. वृत्ती म्हणजे स्वार्थीपणा, अहं भाव, देहाची आसक्ती, वेगळेपण वगैरे. 

सर्व वासना भगवंताकडे वळवणे म्हणजे सहज होणे व्यवहारात. ह्याचे दुसरे नाव म्हणजे आपुलकी भाव सर्व ठिकाणे प्रकट होणे. किंव्हा जाणीव शुद्ध करणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home