Saturday, June 07, 2025

श्री

 श्री 

चक्र आहे अस्तित्वात, तर जे उगवू ते पेरू आणि जे निघून जाईल ते येत राहणारा. आपल्याला फक्त इतर स्थिती इंद्रियांना दिसत नाही, म्हणून त्याचे स्वभाव _वेगळेपणाच्या_ भाषेत मांडणे कठीण पडते. आपल्याला वाटते की इंद्रिय गोचर एखादी वस्तू अनुभवात आली की त्यावर ताबा मिळवू शकू किंवा नियंत्रण ठेवू शकू. 

मुळात सत्य हे आहे की अनेक कारण मिळून गोष्टी दृश्यात येतात किंव्हा इंद्रिय गोचर होतात...त्याच्या अगोदर आणि नंतरही क्रिया सुरू असते आणि ती क्रिया शक्ती करत राहते. म्हणजे अनंत सूक्ष्माच्या पायऱ्या ओलांडून स्थूलात वस्तू येते आणि निघून जाते. आणि जसे ते येते दृश्यात, तशी स्मरणाची प्रक्रिया बदलत जाते आणि त्या प्रमाणे अनुभव निर्माण होतात. 

कुठलाही क्षण किंव्हा वस्तू स्थूल ते सूक्ष्म माध्यम दर्शवू शकते. निर्णय आपल्यावर आहे की वस्तू म्हणजे काय ओळखावे. 

ह्यातून हे बघावे की कार्य कसे करावे आणि त्याचे महत्व काय. आपण भगवंतासाठी आलो आहे, दुसरे तिसरे काहीही केले, तरी त्यातून चक्रच संपादन होणार आहे आणि द्वैत जीवनात राहणार.

म्हणून शांती चक्रा मध्ये स्थिर होणे, हे आपले ध्येय आहे. 

हरि ओम.



श्री 

अस्तित्वात हालचाली किंव्हा गती असणे असणार. हे सर्व शक्तीचे कार्य म्हणावे, ज्यामुळे चक्र, संबंध, साखळी, भाव, जाणीव ही असतेच. त्यामुळे अदृश्यातून दृश्यात येणे आणि अदृश्य स्थितीत निघून जाणे ही क्रिया घडते. ती घडत असताना द्वैत उद्भवते आणि त्या बरोबर अनेक विचार, भावना ह्यांचे स्थान. "द्वैत अनुभव" निर्माण होतो आणि तो अनुभव असतो जीवाचा. म्हणजे अनुभवाचे ही स्थान निर्माण होते आणि त्यात बरेच घटक, क्रिया सामील असतात. 

अनुभव जीव करतो असे स्मरण आपल्याला असते. पण जीव होणे, ही दैवी क्रिया आहे आणि त्यामुळे अनुभवही त्या क्रियेतून येते. भगवंत निरहेतू माध्यम असल्यामुळे, त्यावरून होणारे सर्व घडामोडींचे मूळ निरहेतू हवे. आपल्याला "वाटते" की हालचालींचे "कारण" एखादी घटना असते, पण तसे वाटून घेणे ही एका प्रकारची जाणीव आहे. सत्य हे सांगतात की जाणीव शुद्ध होऊ शकते, ज्यामुळे अनुभवात स्थिरपणा येतो आणि पूर्णपणे अद्वैत अनुभव प्रकट होतो. 

म्हणून नामस्मरणाचे महत्व.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home