श्री
श्री
शांती संक्रांत होणे, हे तर्काने जीवाला मांडणे अवघड असावे, म्हणून तिथे श्रद्धेला स्थान लागते. श्रद्धा जीवाच्या रूपाच्या पलीकडे आहे आणि जेवढी ती शक्ती आत्मसात केली जाईल, तेवढी जवळीकता भगवंत बरोबर साधता येईल. भगवंत स्वतः श्रद्धा आहे, स्वतः सिद्ध आहे, शांत आहे, पूर्ण आहे, अंतर्मुख आहे. त्याला त्याच गुणांनी ओळखायला लागतं - म्हणजे हेच सर्व गुण इतर स्तराना सामावून घेऊ शकतात - म्हणजे हे गुण "पूर्ण" आणि "शाश्वत" म्हणून ओळखले जातात.
विघटन दिसणे आणि भेद करणे आणि प्रतिक्रिया देणे, ही अस्तित्वाची एक स्थिती आहे. त्याला द्वैत म्हणतो आपण - दोनपणा. वास्तविक सत्य ओळखले किंवा सत्य आत्मसात केले, तर तसे वेगळे दोन विभक्त काहीच नसतं. द्वैत स्मरणात निर्माण होणे हे शक्तीचे _कार्य_ आहे, ते मुद्दामून कुणी करत नाही. कार्याचा उगम शांतीतून होतो, म्हणून त्याला हेतू ही व्याख्या लागू पडत नाही! कार्य _का_ असते, असा प्रश्न विचारून चालत नाही, कारण ते स्वतः सिद्ध आहे! म्हणजे आपल्या रूपाचा उगम, क्रिया, बिंदू, साखळी, पुढे, आत्ता, मागे - ह्यात गुंतून राहण्यात काहीच अर्थ नाही, की ज्यामुळे माझे कर्तृत्व किंव्हा सिद्ध होऊ पाहणे साधेल! आपण असतोच, अर्थाच्याही पलीकडे!
पलीकडे म्हणजे शुद्ध अस्तित्व.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home