श्री
श्री
आपले स्मरण शुद्ध जाणीव आहे. त्या जाणीवेच्या बळावर साखळी "निर्माण केली जाते", कार्य होत आणि हेतूच स्वरूप होते, भाव होतो आणि संबंध तैय्यार होतो. त्या जाणिवेला आपण _शक्ती_ म्हणू शकतो. शक्ती असतेच स्वतः सिद्ध. तिला _भगवंत_ , अशी उपमा आपण देतो. भगवंत आहे, म्हणून त्या कारणाने दृश्य जग आहे, हालचाली आहेत, बदल आहेत, संबंध आहेत, भाव आहे, प्रक्रिया देणे आहे...एखादी गोष्ट का करावी, ह्याचे मूळ कारण भगवंतासाठी.
दररोजचा सूर्य, वारा, पाऊस, पाणी, आकाश ह्यांना कोण निर्माण करते आणि संबंधित ठेवते?! आपण कुठून येतो, विचार कसे होतात भावना का जाणवतात?
स्वतः सिद्धेच स्मरण आणि कार्य, हे अनेक संस्कृती मध्ये, अनेक काळात लिहून ठेवले आहे किंव्हा उल्लेख सापडतो. त्यातून अध्यात्म, समाज, कार्य, सामूहिक क्रिया, संकल्पना, कलाकृती असे काहीसे रूप आणि आकार तैय्यार होतात. त्यात आपल्या स्मरणाचाही हातभार लागतो. त्या कार्यात आपण राहतो. आणि शांत होतो.
वरील प्रकार अहं वृत्तीही निर्माण करते. तिच्या मागे गेलो तर ती इतक मोठ जाळ तैय्यार करते की सर्व क्रिया क्लिष्ट आणि विघटित आणि वेगवान होतात. त्यातून माणूस विभक्त आणि एकलकोंडा होतोच होतो, त्यात दुमत नाही.
आहे ते असे आहे. अस्तित्वातून जाणार आहोत कुठे आपण?! जाण्याची जरूरी नाही! आपण होतो कार्यातून, म्हणून निघून जातो एका स्तरात. दृश्यात वावरताना (ज्याचे ७ स्तर संत Dnyaneshwar ह्यांनी उल्लेख केले आहेत) सारे पायऱ्या अनुभवात आणायला लागतात...म्हणजे जाणिवेत. अनुभवाला पकडून ठेवता येत नाही. अनुभव सोडून देणे आणि निरहेतू पद्धतीने बघणे म्हणजे जाणीव शुद्ध करू देणे.
म्हणून शांत होत राहणे. जाणीव शुद्ध करत राहणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home