श्री
श्री
भीती घालवण्याचा आटापिटा करणे वायफळ प्रकरण आहे. तो अस्तित्वाचा एक भाग असल्यामुळे, हा घटक आणि त्याचा परिणाम राहणार! घटक घालवणे, म्हणजे त्यावर लक्ष दिले तर तो अधिक गुंतवून ठेवतो आणि त्याप्रमाणे पूर्ण साखळी दर्शवतो!
म्हणून वासना भगवंत भावाकडे वळवावी, मन आपले पूर्ण त्याच्या विचाराने भरून घ्यावे, म्हणजे इतर वासना उरत नाही, त्यां नाहीसे होतात, त्या शांत होतात...मग भीती कशी काय राहील?! मनाच्या घागरीत भगवंताला ठेवा म्हणजे इतर पदार्थ त्यात येत नाही.
आपल्याला वासना ढकलता येणे कठीण, तिचे रूपांतर करायला लागते एक सूक्ष्म स्थितीत आणि शेवटी शांत करायला लागते.
शांत होण्याची प्रक्रिया आणि त्या पद्धतीने जाणीव होण्याची शक्यता नामस्मरण प्रकट करते.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home