श्री
श्री
असण्यातून, ह्या स्थितीतून, कार्य होते. असणे आणि कार्य हे वेगळे नाही. म्हणजे असण्याचा परिणाम असणार आणि मुळातील अस्तित्व भावना स्वतः सिद्ध असलेले प्रेम आहे, समाधान आहे, श्रद्धा आहे, स्थैर्य आहे. ते पूर्णतः अंतर्मुख होणे आहे आणि त्या होण्यामध्ये अनुभवाचे स्वरूप खूप बदलून जाणे आले. _मार्ग_ जगण्याचा जो आहे, तो म्हणजे हा.
मार्ग ही खूप मोठी, गूढ, विशाल संकल्पना आहे. ती नुसती रेघ नाही किंव्हा एका बिंदू पासून ते दुसऱ्या बिंदू पर्यंत जाणे अशी ही सोप्पी व्याख्या नसावी.
जेवढं बुद्धीने दाखवून दिलेलं dnyan आपण संपादन करतो, तेवढे जास्ती प्रमाणात हालचाली, गती, विघटन, बदल, तात्पुरतेपण जाणवतं! असे का, कारण बुद्धीची भाषा तशी आहे!
तसंच, त्या प्रकारे श्रद्धेचे बीज स्वतः मध्ये रोवले, तर ते पसरून सर्व ठिकाणी कार्य करते आणि त्यातून शांती लाभू शकते.
*कार्य* म्हणजे स्वतः सिद्ध असलेली गोष्ट.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home