श्री
श्री
बुद्धीला किंव्हा त्या शक्तीच्या तर्काला मर्यादा असतात हे विसरू नये. म्हणजे ज्या पद्धतीने, जाणिवेतून ती कार्य करते, त्याला एक चौकट असते. म्हणून जाणीव सूक्ष्म करत राहणे आले, ज्यावरून बुद्धी देखील सूक्ष्म, विशाल, निरहेतू आणि श्रद्धेने कार्य करेल. आपलं शुद्धीकरण बुद्धीवर किंवा भावनांवर केंद्रित नसावे - ते जाणिवेवर असावे, कारण सर्व चक्राचा उगम जाणिवेतून होतो, बुद्धी किंव्हा भावनेतून "नाही".
भगवंत विषय समजून घेण्यासाठी ' हा मोठा बुद्धिमान आहे, हा भावनिक आहे, हा नेणता आहे ' असा भेद नसतो - त्याचा काही उपयोग नाही. श्रद्धेने जगणे हे कुणीही आत्मसात करू शकते आणि ते सर्वात मोलाचे जगणे आहे. रूपाला चिकटून आपण मर्यादेत राहतो, म्हणजे न्यूनपणा बाळगतो, भीती बाळगतो, राग किंव्हा हेवा बाळगतो...काय उपयोग त्याचा?!
त्रास होतो, तेव्हा समजून घेणे की जाणीव अजून सूक्ष्म होण्याची गरज आहे. आपण हेतुला (किंव्हा त्या गुण धर्माला घट्ट धरून राहतो) म्हणून झालेला परिणाम, भोग वगैरे. हेतूचे कार्य खूप खोलवर रुजलेले असते, म्हणून अनंत प्रश्न, धडपड, इथे आणि तिथे भटकणे, मूळ शोधत राहणे, सुटकेची व्याख्या निर्माण करणे हे चालू राहते.
हे सारे चक्र *शांत* करणे आले.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home