Sunday, June 01, 2025

श्री

 श्री 


अगोदरच्या लेखाच्या पार्श्वभूमीवर असे म्हणतात की सर्वात गतिमान, हालचालीत आणि कुंपण करणारी संकल्पना आहे अहं वृत्ती. पैसे का हवा असतो? त्या सारखच दृश्य, नाती गोती, संबंध, भावना, विचार, शरीर हे का हवे असतात?! कारण ह्या घटकांचा आधार वाटतो, त्यातून एक सुरक्षित असण्याची कल्पना मन करते, म्हणून ह्या सर्व होऊ पाहणाऱ्या घटकांना _धरून_ ठेवते. ह्या होणाऱ्या क्रियेला चक्र, भाव, संबंध, बदल, तात्पुरतेपण असे म्हणू. 

आज आपला भाव हा _रेघ_ आहे. रेघ एक वर्तन आहे. त्या वर्तनातून भीती किंव्हा राग ही भावना निर्माण होते. त्या रेघेला जर गोलाकार किंव्हा आकाशा सारखा पोकळीपणा आला, तर भाव शांत होईल. म्हणून शुद्ध जाणीव हे मोकळे आणि पोकळे आकाश आहे, ज्यात सर्व गोष्टी शांत स्थितीत असतात. म्हणजे "शांत" हे सर्वात शक्तिमान प्रकरण मानायला हवे, ज्याच्यातून काहीही निर्माण करण्याची शक्ती असते!

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home