श्री
श्री
भगवंताला पूर्णपणे मागणे, ही प्रार्थना आहे अस्तित्वाकडे. त्यापेक्षा कुठलीही दुसरी वस्तू मागणे म्हणजे त्याच्याकडे "केरसुणी" मागण्यासारखे होईल!..हे विधान श्री गोंदवलेकर महाराजांनी केले आहे.
म्हणजे कुठलही वस्तू, आकार, रूप, भाव, साखळी, दृश्यांची स्थिती ही खूप _संकुचित_ असते, एका केरसुणी प्रमाणे ठरते! दृश्य भाव संकुचित असतो, परावलंबी ठरतो, चक्रात अडकतो, विषयात गुंतून राहतो, अहं वृत्ती जागृत ठेवतो, कशालातरी चिकटून राहतो. म्हणून तो भाव कसा शांत होईल, ह्याचा अभ्यास करावा.
इथे "मागणे" म्हणजे जाणीव शुद्ध करत राहणे हे आहे. म्हणजे शक्तीकडेच, जी स्वतःच्या आत आहे, त्याकडे आपण प्रार्थना करतो.
प्रार्थनेची क्रिया म्हणजे नामस्मरण.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home