श्री
श्री
अस्तित्व आपल्याला कळत नाही पूर्णपणे, म्हणून एखाद्या स्थितीचे कार्य आपण अनुभवतो आणि त्या प्रमाणे भावना प्रकट होतात. ही आपली वस्तुस्थिती आहे.
ह्या वस्तुस्थितीत पहिले काय आणि नंतर काय आणि संबंध कसे, ह्यावर डोकेफोड करून विशेष उपयोग नाही, कारण ह्या चिकित्सक वृत्तीतून शरण जाणे होत नाही किंव्हा श्रद्धा निर्माण होणे अवघड. तरीही ह्या वृत्तीत वावरत राहताना, सर्व शांत कसे करावे ह्याचा अभ्यास निश्चित करावा. आणि तो अभ्यास आपण मानव जीव करू शकतो. म्हणून ते करावे.
आपण खूप वेळा उतावळे होतो, त्रासिक होतो, दुःख सोसतो, सुखही अनुभवतो, चिंतेत राहतो, काळजी करतो. हे सारे भावना कुठून येतात आणि का?
पहिले तर इथे सरळ रेषा सारखे काहीच नसेल. म्हणजे स्पष्ट तर्काप्रमाणे असेलच असे नाही. अनुभवातून, त्याला स्वीकारून, त्याला बघून गोष्टी शांत होतात - एकमेकात स्पर्धा घेऊन नाही. म्हणून प्रवाह, बदल, आत - बाहेर, परिवर्तन, चक्र, जाणीव ह्या संकल्पना किंव्हा क्रिया स्वीकारायला लागतात. त्यातून शांती प्रकट व्हायला लागते. हे भगवंताचे कार्य आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home