Wednesday, July 23, 2025

श्री

 श्री 


घडामोडींचे *अर्थ* (निर्मिती शक्ती, उगम, प्रकट क्रिया, संबंध) भगवंत आहे. म्हणून घाबरण्याचे कारण नाही. कारण तसे पाहिले तर कशालाही लागत नसते! आपण कारण गोष्टीना चिकटवतो, म्हणून त्यात आपण गुंतून राहतो! म्हणजे त्या अर्थाने "कारण" ही संकल्पना स्वार्थी, मर्यादित, तात्पुरती झाली. 

आपल्याला गोष्टींचे अर्थ आणि संबंध खूप प्रकारे कळतात आणि हे एकसारखे असतातच असे नाही (आणि ते पाहिजेतही असेही नाही!). कोडी सर्व माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या समयी सुटतील. म्हणून बुद्धीने कोडी सुटली म्हणून शांती लाभेल असे नाही. सर्वांगीण जेव्हा आपला भाव शांत होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने कुठलीच कोडी राहत नाही. 

तसंच बुद्धीने सांगणे, श्रद्धेने करणे आणि कृतीतून जाणवणे आणि भावनेतून उमगत जाणे, ह्या "वेगळ्या गोष्टी वाटतात किंवा भासतात", पण त्यांना त्यांचे त्यांचे कार्य करू देणे. कधीतरी वेगळ्या पद्धती एकच ठिकाणी किंव्हा एकच निष्कर्षाला येत आहेत, हे जाणवेल.  म्हणून गोष्टींची भूमिका, आपला संबंध हा खूप स्तरातून प्रकट होतो. तो तसा होऊ द्यावा. आपण शांत रहावे. त्यातून सर्व एकच असते, हे जाणवेल. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home