Saturday, July 26, 2025

श्री

श्री 

विचारात काही गोष्टींचा वावर होत असतो...

विषय धरणे आणि तो बुद्धीने किंव्हा भावनेने सोडवता येईल असे समजणे. म्हणजे अर्धवट, तात्पुरतेपण घालवण्याचे आटापिटा करणे. म्हणजे भाव बुद्धीने घालवण्याचा प्रयत्न करणे. त्यात आपण प्रपंचात गुंतून राहतो...

परिस्थिती सतत बदलत राहणे, हे बघणे, चिंतन करणे आणि स्वीकारणे. म्हणजे परिस्थितीचा अर्थ लवचिक असणे आणि मोडून काढू शकणे हे ओळखणे. म्हणजे परिस्थितीचा योग्य अर्थ जाणवला, तर शांती प्रकट होणे....परिस्थितीशी त्याचा बौद्धिक संबंध नसतो. आपण तसा ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्रास होतो. 

अनुभवाचे रसायन, निर्मिती, प्रभाव, कार्य ओळखणे आणि नवीन, नवीन अनुभव मांडू पाहणे. त्यातून कोण सिद्ध होते, ह्याचा विचार न करणे. अनुभव आहे, त्याला स्वीकारणे, त्याला बघणे, आणि तो फक्त व्यक्त करणे. व्यक्त करण्याच्या तऱ्हा अनेक - शांती पासून ते बोलून ते कार्य करून. आपल्या आतील सर्व प्रकाराचे कार्य निरहेतू पद्धतीने पूर्ण स्वीकारणे आणि हे शक्तीचे कार्य आहे, हे स्वीकारणे. त्यात कुणाचाही व्ययक्तिक फायदा नसतो, ही संकल्पनाही नसते. जे आहे, ते आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home