Monday, August 25, 2025

श्री

श्री 

दररोज एक विचार प्रकट होतो आणि तो संबंध निर्माण करतो आणि दृश्याचा अर्थ दर्शवतो. "प्रकट होऊ पाहणे" हे भगवंताच्या अस्तित्वाचे, त्या शक्तीचे कार्य आहे, म्हणून त्याचे स्थान कायम राहणार. प्रकट होण्यात साखळी, संबंध, स्थिती, स्तर, रूप, आकार असे घटक असणार, ज्यावरून _तुम्ही आणि आम्ही होतो._ *होणे* हे कार्य आहे.  प्रकट कार्यात विचार आणि भावना देखील होऊ पाहतात आणि त्याचे संस्कार (स्वभाव) अनुभव देतात. 

सांगण्याचे तात्पर्य असे की सगळ्याच्या मुळाशी भगवत शक्ती वावरते. ती आहे, म्हणून बाहेरील प्रक्रिया आहेत. सर्व घटकांचा पाया ती शक्ती आहे. हेच जाणून घ्यायचे आहे, आपल्या प्रपंचातून, कार्यातून, विचारातून, भावनेतून. 

तुम्ही जसे बघाल, तसे जग वाटेल तुम्हाला. भाव शुद्ध झाला, की जग देखील शुद्ध जाणवेल. म्हणून जग काय आहे किंव्हा कसे असते, ह्याच्या पेक्षा आपण कोण आहोत हा प्रश्न जास्ती मोलाचा ठरावा. 

विचार निर्माण होणे ही गूढ प्रक्रिया असते आणि भगवत इच्छेतून येते. म्हणून ती काय करायला लावेल, हे स्वीकारावे. कशाला तरी चिकटेल, मग विघटन करेल, मग संबंध जोडेल, मग काळ आणि स्थळाचा अर्थ लावेल किंवा निर्माण करेल, मग बदलू पाहील, वगैरे. हे बघावे. ह्यातून निष्कर्ष स्वार्थी असू नये. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home