Wednesday, August 20, 2025

श्री

श्री 

वरील "परिवर्तन" ही व्याख्या बघून, असे दिसून येते की बुद्धी शक्ती "परिवर्तन" क्रियेला वेग, वेगळ्या साच्यात ठेवते आणि त्यावरून साखळीचा संकल्पना मांडू इच्छिते (mapping and zoning and movement). गती, बदल, हालचाली (movement), *का* होतात मनात आणि देहात? हालचाली होणे, ह्याचा अर्थ हा होतो की सर्व वेग वेगळ्या भासणाऱ्या गोष्टी *एकच* असल्यामुळे त्यांच्यात व्यवहार होणारच. Movement is an indication of relationship, connections and synthesis and coming together. It is an integral part of becoming whole. Movement may therefore be physical or mental or in other planes of existence - all expressing their intentions through architecture (or through any action). 

हे वास्तुशास्त्रात आम्ही शिकतो. तसेच, ते वागणुकीतही असायला हवे, कारण वागणूकच मूळ आहे, जिथून साऱ्या संकल्पना कामात प्रचितीस येतात. 

त्यातून संकल्पना स्मरण, अनुभव, संबंध आणि भोगाची येते. भोग (म्हणजे व्यवहार, विघटन, साखळी, परिणाम, गुढत्व, विचार, भावना आणि सर्व प्रकाराचे संबंध) आपल्या अनुभवात प्रकट होणार, वावरणार आणि निघून जाणार. 

अध्यात्म असे सांगते की वरील प्रक्रिया होऊ द्यावी आणि त्यातून संकल्पना किंव्हा स्मरण घडू द्यावे - तिला भगवत इच्छा मानावी. त्यातून "मार्ग" (किंव्हा स्वीकार, स्थिरता आणि शांती भाव) हे जाणून घेणे आले. गोष्टींचे होणे, वावरणे आणि निघून जाणे आपल्या अनुभवात राहणार आहे. तर त्यातून मनाची स्थिरता संक्रांत करता येईल का?

आपल्या सध्याच्या मर्यादेमुळे आपण हेतू प्रकट करतो आणि त्वरित निर्णय देण्याचा अट्टाहास धरतो. वरील प्रवाह पहिला, तर गोष्टींचे होणे, वावरणे आणि निघून जाणे हा अस्तित्वाचा गुण धर्म मानायला हवा, तर त्यात हेतू का मिसळावा? गोष्टी जे होणार आहेत, ते होतील. जे जाणार आहे, ते जात राहतील. जे कायम असणार आहेत, ते उरतील. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home