Saturday, August 23, 2025

श्री

श्री 

प्रत्येक विचाराशी संबंध _निर्माण_ करावे, हे गरजेचे नसते. कारण त्या होऊ पाहणाऱ्या संबंधातून एक प्रकाराची स्थिती आणि भाव निर्माण होतो. वृत्ती, विचार, भावना - हे संबंध निर्माण करणारे रसायन आहेत आणि त्याचा स्पर्श कुठल्या स्थितीत येतो, त्याचे संस्कार मनात भरतात किंव्हा परिणाम करतात आणि तशे स्मरण होऊ पाहते अस्तित्वाचे. 

त्यावरून हे ठरवावे की सहवास कशाचा हवा? भगवंताचा की दृश्याचा? भगवंताच्या सहवासाचे रसायन म्हणजे नामस्मरण. ते नाम श्रद्धेने घ्यावे आणि तो सहवास आत, आत न्यावा की सर्व वृत्ती शांत होते. आपण शंका खूप घेतो सर्व गोष्टींची. असेलही ते नैसर्गिक. पण त्याने समाधान प्रकट होते का, तो त्यातून प्रश्न निर्माण झाला तर ठीकच आहे!! कारण त्यामुळे योग्य परिवर्तन होण्याची भूमिका काय म्हणावी, ह्याचा शोध तरी सुरू होईल!! 

समाधान, शांती असतेच. ती मनात साकार व्हायला लागते. गोष्टी घडतात. त्यातून आपण ठरत नसतो कधीही. त्यातून काही करायलाच हवे, असे ही नाही. त्यातून हेतू काय ठेवावा, ह्यात गुंतून रहायलाच हवे, असे ही नाही. म्हणजे समाधान संक्रांत व्हायला ह्या कुठल्याही गोष्टीची जरूरी नसते. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home