श्री
श्री
जाणीव शुद्ध करायला लागते. त्याचे बरेच मार्गही असतील, साखळीही असेल, संबंधांचे स्वरूपही असेल...तरीही, अनुभव म्हणल्यावर, त्या प्रकारे क्रिया करणे हे जरुरीचे ठरते. ती क्रिया म्हणजे नामस्मरण. त्यातून जो व्हायचा आहे परिवर्तन, तो होत राहतो, श्रद्धा वाढते, मनाला सूक्ष्म स्वरूप येते, धीमेपणा प्रकट होतो, शांती भाव संक्रांत होतो.
विचारात चिंतन करत राहावे, हे चालू राहू दे. पण त्याने सूक्ष्मता येईल का, ह्याचे उत्तर बुद्धी देऊ शकते का, हे ओळखावे. बुद्धीचे भोग आणि परिणामांना सामोरे जायला लागेलच. दृश्याचा अनुभवांना सामोरे जाणे आले, त्यातून क्रिया आणि हेतू आले, हालचाली आल्या, बदल आले, गती आली वगैरे.
शांती आणि धीमेपणाचा अनुभव असतो. देहाची गती असते, तशीच भावनेची आणि विचारांची. एका मर्यादेच्या पलीकडे जाणीव गेली, की वरील गती ध्यानात उमटत नाही. त्यामुळे, त्या गतीतून निर्माण होणाऱ्या भावना देखील सूक्ष्मात प्रकट होत नाही. म्हणजेच सुख, दुःख भावना येत नाही.
विचार काय, भावना काय - हे गतीची स्थिती दर्शवतात. कितीही केले, तरी गती शांत होईल का? जेवढी मर्यादा अधिक (like a passage), तेवढी गती किंव्हा वेग जास्ती. जेवढी मर्यादा विशाल, (like a courtyard), तेवढी गती हळुवार, धीमी आणि शांतीने वावर होऊ पाहणे. Therefore outside spatial proportions have a relation with inner mindspace - the two maybe "of one thread" getting expressed in different forms from inside to outside.
आजकालची वागणूक passage केल्या सारखी आहे. आणि इतकी वेग निर्माण करणारी आहे, की जवळच्या गोष्टी ध्यानात येतच नाही! मग कोण काय बोलतंय, काय करायला सांगतय, त्या बद्दलचे विचार - काहीच, काहीच ऐकू येईनासे होतात!
भगवंत भाव स्थिर असतो. तो गतीत रमणाऱ्या वृत्तीला "जाणून येत नाही/ कळत नाही/ दिसत नाही". म्हणून वृत्ती शांत झाली/ विलीन झाली, की भगवंत भाव "प्रकट होतो/ साक्षात येतो/ स्थित होतो".
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home