Monday, August 18, 2025

श्री

श्री 

 _वृत्ती_ जीवाचे कार्य/ भाव घडवते, त्यातून आपण वेगळे विचार करतो. त्यातून वेगळ्या पद्धतीतून शब्दात मांडतो. त्यातून वेगळ्या पद्धतीतून ऐकले जाते. त्यातून वेगळ्या पद्धतीतून आत परिणाम होतो. 

ह्याचे दोन अर्थ निघतात. की हेतुचे मूळ बुद्धीने शोधू नये, कारण त्यात आपण स्वतःचे रंग मिसळतो. किंबहुना हेतू काय असावा, ते सर्वस्वी स्वतःची जबाबदारी झाली, इथे परिस्थिती आड येऊ नये. किंबहुना परिस्थितीचा काय अर्थ लावावा, तो स्वतः ठरवावा (परिस्थिती नाही). म्हणजे अंतःकरण शुद्ध आणि सत्य होऊ द्यावे. सोप्प अर्थ असा की दुसऱ्यांच्या वागण्याने किंव्हा शब्दाने त्रास करून घेऊ नये. ते कुठल्या आतील हेतूने काय करतात, ते पूर्ण कळत नसते आपल्याला. हेतूचा स्वभाव देहाशी संबंधित असतो, किंव्हा देहाचे भोग जाणिवे पर्यंत आणले असतात म्हणून जाणीव आणि देहाचा स्वभाव, वावर, बदल, स्पंदने हे आपण _एकच_ समजून घेतो. मुळात जाणीव देहापेक्षा खूप सूक्ष्म आहे. _भोग_ म्हणजे साखळीतील होणारा संबंध आणि त्याचा परिणाम. 

अस्तित्वाला आत आणि बाहेर, असे दोन अंग आहेत. आतील अनुभव सूक्ष्म आणि सत्य आणि शांत भाव असतो; बाहेरील अनुभव तात्पुरता, वेगळा, अस्थिर, परावलंबी असतो. तो भाव वृत्ती असल्यामुळे जन्मास येतो आणि वावरत राहतो. 

जाणीव स्थिर होण्यास गत्यंतर नाही, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक महत्वाची गोष्ट नाही. कितीही बोलले आणि केले, तरी अपुरे असते. श्रद्धेने सत्य कळते. सत्य कळतांना परिवर्तन होते विचारात. ते परिवर्तन वृत्तीला _जाळून_ टाकते - म्हणजे ही क्रिया भक्कम ध्येय असल्या शिवाय पचनी पडत नाही. आपल्या अंतरंगाला गरम, वेदनेचा चटका बसू शकतो. अनुभव भगवत देतो, ते स्वीकारावे लागतात आणि त्यातून परिवर्तन होऊन शांती भाव संक्रांत होते. 

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home