श्री
श्री
अध्यात्माचा अर्थ बऱ्याच वेळेला असा वाटू शकतो, की ते उत्तर देईल किंवा मनाचे कोडी सोडवेल. तो कोडी सोडवेल, पण फक्त बुद्धीच्या भाषेत मर्यादित नसेल. ह्याचा अर्थ असा, की कोडींची जाणीव खूप आतून, सूक्ष्म पातळीतून प्रकट झाली असते. गाठ खूप आत असते, जो गुंता वैचारिक पातळीवर फक्त सोडवता येत नाही. म्हणजे ज्याला आपण तात्पुरतेपण, वेगळेपण, भीती, राग, अट्टाहास असे काही भावना म्हणू, त्या सर्वांचे उगम आतील सूक्ष्म स्थितीतून होत असते. म्हणून ते समजून घेण्यास अंतर्मुख होणे आले आणि ते होत असताना सर्व भावनांचे परिवर्तन होत राहते. विचार आणि भावना बहिर्मुख आहेत जे कृती करायला भाग पाडतात. ते स्वार्थी ठरतात, देहाशी निगडित राहतात, परावलंबित असतात. म्हणून त्यांचा जोर खूप बहिर्मुख असतो. त्या प्रवाहाच्या उलट दिशेला, म्हणजे अंतर्मुख होणे आहे. साहजिकच प्रपंचाचे संस्कार मागे टाकले की सूक्ष्मपणा येतो. ह्याला धीमेपण आणि श्रद्धा लागते, प्रयत्न बरोबर.
आता दुसर म्हणजे खूप जणांना खंत असते की आपण दोषी आहोत आणि त्यामुळे न्यूनपणा येऊ शकतो. मला वाटतं असा विचार जरी आला, तरी तो जाऊ द्यावा आणि त्यात (त्याच्या होऊ पाहणाऱ्या इतर संबंध मध्ये) गुंतून राहू नये. म्हणजे विचार आणि भावना (मग ते कुठलेही असो आणि काहीही घेऊन येवो) येतील, वावरातील आणि निघून जातील. ते ही शांतीने स्वीकारावे.
तिसरी गोष्ट ही की जे भोग आहेत विचारांमुळे आणि भावनांचे, ते स्वीकारावे. जो काही त्रास वाटतो, खंत वाटते, दुःख होत, त्यातून जावे, ते अनुभवावे - त्यातून शांती भाव निर्माण होऊ पाहतो. ह्या मानवी भावना विधिलिखित आहे आणि त्याचा अनुभव नैसर्गिक आहे. त्यातून सुटका नाही आणि पळून जाता येत नाही. जे असणार आहे, ते राहणार आहे.
चौथी गोष्ट ही, की दुसऱ्यांची परिस्थिती जाणून घेणे, पण अडचणी सोडवण्याचा अट्टाहास किंव्हा जबाबदारी घेऊ नये, त्यातून आपण दुःखाचे संबंध स्वतःवर प्रकट करून घेतो. भोगाची भाषा समजायची असेल, तर भोगाचे संस्कार स्वतःवर घ्यायला लागतात.
ह्यावरून असे कळते की भगवंत कळण्यासाठी त्याचे संस्कार मनात आणायला लागतात. कुठलाही विषय तो आत - बाहेर चक्र असतो (सर्वांगीण असतो). म्हणून भगवंत होणे, म्हणजे सर्वांगीण तसा भाव प्रकट होणे आले.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home