Saturday, August 16, 2025

श्री

 श्री 


वृत्ती कशी परिणाम करते आणि कार्य घडवते - साखळी आणि संबंधांचे स्वरूप, हे गूढ रहस्य आहे. म्हणून त्वरित लोकांच्या व्यवहारावरून निष्कर्ष करण्याची घाई करू नये. तसेच आपण कसे होतो, कुठून येत राहतो, कसे बदलत राहतो, कुठे जाणार आहोत, ह्याचा निष्कर्ष काढता येणार नाही त्वरित. सैय्यम हवा. सैय्यम, ह्याचा अर्थ हा, की हेतू गळून जाणे आणि बौद्धिक उत्तराची अपेक्षा विलीन होणे, म्हणजेच सूक्ष्म होणे, अदृश्य होणे. आपण "हेतू" मध्ये वावरत असतो. तो निघून गेला की अदृश्य शक्तित वावरू. 

अदृश्य, म्हणजे ज्याचे अस्तित्व आणि कार्य आकलनाच्या किंव्हा रूपाच्या पलीकडे राहते, स्थित असते, कायम असते, निरहेतू असते, शांत असते. अदृश्य माध्यमाचे अस्तित्व निश्चित असते आणि त्याचा अनुभव संक्रांत होणे, म्हणजेच शांत होणे. 

वरील विचाराचे खूप अर्थ निघून येतात. काळ, स्थळ, सुरू, बदल, शेवट ह्या संकल्पना आपण निर्माण करतो आणि त्यांचे परिणाम असतात. परिणाम म्हणजे चक्र. परिणाम चांगले का वाईट हा एक मुद्दा झाला. त्याच्याही अजून सूक्ष्म संकल्पना ही की परिणामाची निर्मिती जाणून घेणे आणि योग्य कार्यात स्वतःला झोकून देणे. *परिणाम* म्हणलं की एक अखंड अदृश्यापासून ते दृश्यात वावरणारी क्रिया प्रकट होणे आणि परत दृश्यात विलीन होणे. त्या _क्रियेचे_ "संस्कार" आपल्या मनावर आपण करून घेतो, म्हणून तसे अनुभव वावरत राहतात आणि दृश्याची (अस्तित्व स्थितीची) प्रचिती येत राहते. हेच ते गूढ कार्य म्हणायचे, जे का होते, कसे होते, कधी होते, केव्हा होते, कुठे होते, ह्याचा ठाम पत्ता आपल्याला लागू शकत नाही, म्हणून श्रद्धेने ह्या स्थितीला सामोरे जाणे येते. 

श्रद्धा, म्हणजे ह्या सर्व कार्याची चिंता न करणे आणि नामाच्या अस्तित्वात स्थिर होणे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home