श्री
श्री
दृश्याचे, वृत्तीचे संस्कार चंचल असते, बदलत राहते, म्हणून ते नवीन, नवीन विषयात गुंतून ठेवते. समाधान रुपात किंव्हा आकारात नाही, म्हणजे रूप किंव्हा आकार पूर्णतः अनुभव देत नाही. "अनुभव" ह्याचा अर्थ जे सतत संबंधित राहते, भाव निर्माण करते आणि परिणाम देते.
साखळी कशी निर्माण होते, ह्यावर शुद्ध श्रद्धा ठेवायला लागते, त्याला कोड समजून सोडवायला जाऊ नये. It is *not* a problem to be fixed. त्यातून सर्व स्वीकारावे आणि भोग शांतीने झेलावे, असा काहीसा अर्थ निघून येतो. म्हणजे अस्तित्वाच्या शक्तीचे कार्य गूढ असते आणि ते काय अनुभव प्रकार करेल, हे सांगता येत नाही. पण अनुभवातून मार्ग निर्माण करत, अस्तित्व शक्ती संक्रांत करायला लागते. भगवंताच्या शक्तीतच हे विधिलिखित आहे - रूप होणे आणि जाणिवेतून शांत होणे.
प्रवाहाला कंटाळू नये आणि पळून जाऊ नये. सर्व देऊन टाकणे, मोकळं होणे, इतक की कशाचेही स्मरण रहाण्याची गरज नाही. ह्याचा अर्थ की स्मरण हेतू रहित बनावे. सध्या स्मरण परावलंबित आहे. ते ही शांत करावे. म्हणजे शांती भाव संक्रांत होणे, ह्याचा अर्थ की मानवी स्मरण असण्याची गरज नाही. The real meaning of memory is pure awareness of Being. Memory is not about retaining and applying but about Being.
आपण कार्य करावे. त्याचा परिणाम होईल. तो कसा, ह्या बद्दल चिंता नसावी. आपल्याकडे नेहमीच काही परिस्थिती ओढले जातात. ते कसे, हे कोड मानल्या पेक्षा, त्याकडे गूढता असे बघावे आणि त्या चक्रात श्रद्धा भाव प्रकट होऊ देणे. श्रद्धा वस्तू नाही. ती कार्य करत मनात संक्रांत होते. त्या पद्धतीने स्वतःवर योग्य परिणाम होऊ द्यावा.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home