Thursday, August 28, 2025

श्री

 श्री 


एखादी गोष्ट व्ययक्तिक तेव्हा होते जेव्हा तिच्याशी संबंध वृत्तीतून होते. म्हणजे वृत्ती त्या गोष्टीचे स्मरण निर्माण करते आणि त्यातून अनेक विचार चक्र आणि भावना. गोष्ट म्हणजे शेवटी काय? तर विचार आणि भावनांचे मिश्रण! त्यामुळे ती गोष्ट परिणाम करते, बदलत राहते! 

विचारांमध्ये आणि भावनेत गुंतून घेऊ नये. त्यांना येऊ द्यावे, बघावे आणि निघून जाऊ द्यावे. तरच गोष्टी त्रास देत नाही, बेचैन करत नाही. 

वृत्ती कुठे गुंतली असते, हे ओळखावे. तो अभ्यास आहे. ते का गुंतून राहते, हे ही ओळखावे. इथे "का" हा दोष ह्या अर्थाने सांगितला नाही. तो गुण आहे मनाचा. प्रयासाने, सत्य ओळखण्याच्या मार्गाने, वृत्ती शिथिल होते. ते झाल्यावर मन शुद्ध होते. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home