श्री
श्री
अस्तित्व शक्तीचे कार्य खूप गूढ असते. जे विचारातून अणि भावनेच्या द्वारा जाणून येते, ती एक *भाषा* झाली शक्तीची, संबंधाची, स्थळाची, काळाची, क्रियाची, माझी, तुझी, व्यवहाराची, कामाची, परिणामांची...भाषा - म्हणजे कार्य घडण्याची स्थिती.
भगवंताची भाषा स्थिर, सूक्ष्म आणि कायम असते. त्यातून सर्व अनुभव निर्माण होऊ पाहतात आणि भाव शांत राहतो. त्याच्याशी बोलायचे असेल, तर तशी भाषा आपणही आत्मसात करायला हवे. संतांच्या अनुभवातून त्या भाषेला नामस्मरण म्हणतात. त्याचे नाम घेत गेल्याने, त्याच्याशी निरहेतू, शुद्ध, शांत पद्धतीने बोलता येते.
आपल्या समोर विचारांची साखळी असते आणि तशी परिस्थितीत घडल्यासारखी दिसते. ते पूर्ण का मानावे? किंव्हा त्याही पेक्षा अधिक सूक्ष्म शक्तीचे व्यवहार किंव्हा निराळी शांत परिस्थिती आपण *निर्माण* करू शकतो. परिस्थिती म्हणजे रूप आणि आकार ह्यांच्याशी होऊ पाहणारे "संबंध" किंव्हा प्रत्यक्ष भाव. त्याला काही मर्यादा नाही. रूप आणि आकार, असे म्हणण्यापेक्षा, जे खरे निर्माण होते ते म्हणजे संबंध/ भाव. ते ध्यानात आणावे. काहीही करणे शक्य आहे.
आपण काय निर्माण करत आहोत, हे बघावे. वृत्ती काय दर्शवेल? चिंता की शांतता? निर्मितीला अंत नाही, म्हणून ते सर्व ठिकाणी पसरते. चिंतेचे मूळ कुठे आहे, हे बघावे आणि तिला शांत करावे. वृत्ती कुठे गुंतत असते, हे जाणून घ्यावे आणि शांतीकडे वळवावे.
सार्वजनिक अनुभव आणि वैयक्तिक अनुभवातही संबंध निश्चित असतो. म्हणून स्वतःशी कसे वागतो, त्या प्रमाणे इतरांशी संबंध होतात, परिस्थिती तशी होते. आपल्या हातात फक्त शुद्ध होणे, एवढेच आहे. त्याचा परिणाम म्हणलं तर योग्यच होईल. परिणामही देवच देतो, तर त्यावर श्रद्धा ठेवावी.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home