श्री
श्री
सुरुवात जाणून घेणे बुद्धीने ह्यात बऱ्याच गोष्टी असतात. जाणणे, हे कार्य गूढ आहे, फक्त बौद्धिक नाही किंव्हा सरळ नसावे, किंव्हा हेतू ठेवून नसावे, किंव्हा भोग असावे, किंव्हा अनुभव असावे, किंव्हा संबंधात रहावे, किंव्हा परिणाम सोसावे, किंव्हा श्रद्धा वाढवत रहावे.
आपली वाटचाल असते आणि त्या वाटचालीतून भगवंत भाव शोधायला लागतो, तसे बनायला लागते, तसं परिवर्तन व्हायला लागतं. त्यात काही संस्कार महत्वाचे ठरतात
एक - भगवंताच्या शक्तीची आठवण दररोज काढावी.
दोन - आपली श्रद्धा परिस्थितीवर, जी भगवंताने निर्माण केली आहे, त्यावर पूर्ण ठेवावी.
तीन - स्वतःचा अनुभव प्रमाण मानून त्यात शुद्ध परिवर्तन होण्याचा प्रयत्न करावे.
चार - प्रत्येकाला स्वतःची अंतर्मुख असणारी आवड दिली आहे. ती जोपासावी आणि त्यातून सर्व विश्व आनंदी बघावे.
पाच - स्थिर होण्याचा अभ्यास कायम ठेवावे. भोग कसेही असावे, प्रारब्ध कसेही रूप घ्यावे, त्याने कष्टी होऊ नये. चक्रावर श्रद्धा ठेवावी.
सहा - दुसऱ्यांचा दोष शोधू नये आणि स्वतःला दोषी मानू नये. जे आहे, ते स्वीकारावे स्वार्थी हेतू न ठेवता.
सात - घडामोडींचे मूळ भगवंत आहे, हे स्वीकारणे...मग ते बाहेरील असो किंवा आतील असो किंवा दोघांच्या मधील.
आठ - संबंध आपणात येऊ पाहते आणि त्याला सूक्ष्म आणि स्थूल स्थिती असावी. ती खूप काळापासून येत असावी, म्हणून शुद्ध होत जाणे हा प्रवास असावे.
नऊ - शुद्ध होण्याचा निश्चय व्हायला लागतो. मग त्यातून मार्ग तैय्यार होतो आणि स्थिरतेकडे आपण जातो. शुद्धता ही आपल्या प्रपंचाच्या भाषेतून ओळखायला लागते.
हरि ओम.
ReplyForward |
0 Comments:
Post a Comment
<< Home