Tuesday, September 02, 2025

श्री

 श्री 


अध्यात्म मध्ये मनाचे रूप किंव्हा अस्तित्वाचे रूप *विश्लेषण* सारखे दिसून येते - म्हणजे ते अनुभवाच्या मार्गातून जाणून घ्यायला लागते, तो वृत्तीला चिकटून किंवा ती प्रज्वलित करून कळून येत नाही. म्हणजे वृत्तीत परिवर्तन होणे अभिप्रेत आहे. म्हणजे शांती भाव आत्मसात करणे गरजेचे आहे. शांती भाव असतेच, पण ती अनुभवातून शोधायला लागते. ती शोधत राहताना मार्ग गूढ आहे, म्हणजे मनाने, रूपाने, बुद्धीने, भावनेने चिकटून दाखवलेला मार्गाच्या पलीकडे जाणे आले. म्हणून अनुभव येत राहणार, त्यात परिवर्तन होणार, त्रास होणार, शंका येणार, तरीही सत्य कळण्यासाठी सातत्याने मार्ग जोपासणे आले. त्रास आणि शंका हे "चक्र आणि संबंध" दर्शवते, तर ते आपल्या अनुभवात राहणार. त्याचे रूप बदलेल, पण त्रास आणि शंका असेल. ते येणे गरजेचे आहे, कारण त्यातून शोध चालू राहून सत्य प्रकट होते. म्हणून एकंदरीत कुठलेही अनुभव प्रकट होत गेले, तरी त्यातून पुढचा मार्ग आखण्याचे प्रयोजन असते. 

दुसरी गोष्ट अशी, की विचारातून आपण संबंधित विचार आकर्षित करतो स्वतःकडे. ते दुसऱ्यांना सांगता येतीलच अशी खात्री देता येत नाही, म्हणून प्रवास स्वतः पत्करायला लागतो. आपली काळजी, चिंता, दुःख - त्यांचा अर्थ त्या विचार चक्रातून होत असते. ते स्वीकारावे आणि शांत होण्याचा प्रयत्न करत राहणे. 

तिसरी गोष्ट ही की _सर्व_ प्रकाराचे विचार (आतील आणि बाहेरील) कळून घ्यायलाच हवे, असे काहीही नाही, कारण विचारांचे त्याचे त्याचे संस्कार असतात आणि त्यांचा प्रभाव होत असतो मनावर. ते हवेत की नाही, त्याचा निर्णय घ्यावे. 

तिसऱ्या गोष्टीवरून हे कळून येते की बदल कसेही होत गेले, प्रारब्ध कसेही आले, तरीही त्याने आतील शांती कायम राहू शकते आणि प्रारब्धाचा शांतीवर काहीही संबंध *नसतो*. त्यावरून *श्रद्धेचे* स्थान  प्रकट होते, स्थित होते. 

मूळ गोष्ट अशी आहे की श्रद्धा भगवंतावर वाढवणे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home