Saturday, October 11, 2025

श्री

 श्री 


प्रत्येकाचे मन वेगळे असण्याचे भाव निर्माण होते. प्रत्येकजण त्याच्या रूपाला, साखळीला, स्मरणाला, विषयाना, परिणामांना, चक्राला, स्थितीला धरून असतो. प्रत्येकी होणे, हे सूक्ष्म सत्यातून होते आणि सत्याकडे ओळख होण्याचा प्रवास प्रत्येकाचा म्हणून वेगळा ठरतो. सर्व मार्ग वेगळे, पण शेवटी सगळे मार्ग एकाच सत्यात विलीन होतात. त्याचे कारण उघड आहे - मार्ग आपल्याला स्वतंत्र जरी वाटत असला, तरीही जाणीव प्रवाहाची आणि आपुलकीच्या संबंधांची होत शेवटी स्थिरताकडे येऊ पाहते. आपले वेगळे असणे, ही भगवंताची इच्छा मानून, त्यातून निर्माण होणारे अनुभव (विघटित किंव्हा मर्यादित), *प्रमाण* (आणि विश्लेषण) म्हणून ओळखून,  सत्याकडे वाटचाल करावी. 

आपण भगवंताचे आहोत आणि एकच आहोत, ही भावना आत (अंतःकरणापासून) स्थिरावलेली हवी. त्याची सुरुवात आज पासून करावी. भगवंताची इच्छा म्हणजे वृत्ती वरून क्रिया करण्याची गरज न उत्पन्न होणे, म्हणजे पूर्ण शरण भगवंताच्या कार्यावर ठेवणे. स्वतःचीपण काळजी करू नये आणि शंका घेऊ नये आणि मत मांडण्याची गरज भासू नये. अर्थात ही समज जरी सर्वांसाठी सारखीच लागू असली, तरीही ती आत्मसात प्रत्येकाला त्याच्या रूपाच्या द्वारे करणे आवश्यक असते, तरच वरील परिवर्तन खरे जाणवते आणि भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती येते. 

हरि ओम.


श्री 

आपली गत अशी झाली आहे, जर ओळखता आले नाही तर, घोडा पाहिले की नाळ हे नेमकं कळत नाही! मग त्यातून खूप सारा गोंधळ, गडबड, बडबड असे सामोरे जायला लागते अनुभवाना. 

मूळ विघटनातून होणारे सारे प्रकरण आहे. तरीही त्यातूनच स्वच्छ ध्येय आत्मसात करणे आले. 

इथ पर्यंत आपण कसे येऊन थबकलो ह्याचे खूप सारे कारण आहेत, ते देतो ही येतील...पण त्याने कोड सुटणार आहे का? स्पष्टीकरणेतून हेतू कळतो, म्हणजेच परावलंबन. शेवटी प्रयत्न, श्रद्धा, कृपा हे राहणारच महत्वाचे घटक. पहिले काय, नंतर काय, संबंध कसे...हे न संपणाऱ्या गोष्टी असतात आणि वावरत राहतात....त्याने समाधान मिळेल का? संबंध असतातच आणि ते गूढ असतात. ते आपल्या रूपातून ओळखावे लागते. ते कोड नाही सोडवण्याचे, पण त्यात वावरत राहताना परिस्थिती स्वीकारण्याचे आहे
.
म्हणून खूप विचार न करता, नामात रहावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home