श्री
श्री
हालचालींचे बीज भगवंताच्या शक्तित असते. ती शक्ती सगळीकडे भरलेली (सगळ्या
स्तरात, सगळ्या स्थितीत), शांत,
कायम, सूक्ष्म, विशाल असते. त्या
शक्तीतून सारे दृश्याचे उगमहोटे. त्या दृश्य भावाला अनेक स्तर,
स्थिती, साखळी, संबंध,
चक्र, भाव, परिणाम - असे अनेक
कंगोरे सामील असतात. माझे होणे, वावरणे,
संबंधित राहणे, हा ही दृश्याचा प्रकार आहे. दृश्याच्या असण्यावर
किंव्हा वावरण्यावर, मी वेगळा आहे (आणि नाही). हे दोन्ही गोष्टी अनुभवात
असतात म्हणून "मन" ही शक्ती असते जिच्यात दोन्ही स्थितींचे मिश्रण असते
आणि एक स्थितीतून दुसऱ्या स्थिती पर्यंतचा तिचा प्रवास असतो,
तिला प्रवाह जाणवतो आणि तिला परिणामांना सामोरे जायला लागते.
तात्पर्य असे, की ह्या प्रवासात भगवंताची साथ लागतेच लागते,
म्हणून नामस्मरण करावे.
हरि ओम.
श्री
काही विचारांची फेरफार
सगळे कळलेले पाहिजे असे काही नाही. उलट जे कळेल, ते वृत्ती ठेवून
किंव्हा हेतू ठेवून कळते, म्हणून नकळत गोष्टी ध्यानात येणे आणि निघून जाणे,
ह्याला खूप महत्व आहे. नकळत म्हणजे स्वतःच्या वृत्तीचा विसर होणे,
किंव्हा वासना शांत होऊन गोष्टी घडत राहणे. ह्यावरून असे दिसून येते की विषय,
कोडी, रूप, आकार,
बदल, संबंध, हालचाली - हे सर्व
कळून घेण्याची तशी गरज नसते शुद्ध अस्तित्व ओळखण्यासाठी. ते ओळखता येते,
जर मन शुद्ध झाले तर. म्हणून काय येते आणि काय निघून जाते,
ह्याची चिंता न करता, स्वस्थ रहावे आणि सतत चिंतन करावे. जो योग्य परिणाम
व्हायचा असेल तो होईल.
अस्तित्व भाव काय समजावा, ह्याची आतून खूप
तळमळ हवी. ती दाखवण्याची जरुरी नसते. तो आतील शोध असतो. तो शोध मांडताही येत नाही,
काय गवसेल हे सांगू शकत नाही, कधी पूर्ण होईल हे
ही नमूद करू शकत नाही, कुठून सुरू करावे ह्याचेही सरळ उत्तर नसते. म्हणजे
थोडक्यात हा शोध सर्वस्वी श्रद्धेच्या शक्तीवर आधारित असतो.
शोधाचा आणि बाहेरील घडामोडीचा सरळ किंव्हा थेट बौद्धिक संबंध नसतो,
किंबहुना तसा दिसत तरी नाही. म्हणून त्याने व्याकुळ होऊ नये किंव्हा संबंध
"जोडण्याचा" अट्टाहासही धरू नये. उत्तर कळेल तेव्हा कळेल.
शोध त्याचा त्याचा मार्गावर असतो आणि आपला वावर त्याच्या त्याच्या मार्गावर.
दोन्ही मार्गांचा संबंध जरी सांगता नाही आला, तरी तो संबंध असतो.
म्हणून शुद्ध होण्याचा परिणाम निश्चित प्रपंचात उमटतो. प्रकार असा आहे की
प्रपंचाची सुरुवात आतून होत असते (सूक्ष्मातून). पण सूक्ष्म स्थितीचा स्वभाव आणि
भाषा खूप निराळी आहे स्थूल रूप आणि आकारापेक्षा. म्हणून स्थूलाचे नियम आपण
सूक्ष्मावर लागू करू शकत नाही. म्हणून स्थूलाचे परिणाम आणि सूक्ष्माचा अनुभव ह्यात
थेट _स्थूल संबंध_ लावू नये. संबंधांचे स्वरूप
सूक्ष्म करावे.
तिसरी गोष्ट ही की दृश्यात बऱ्याच हालचाली दिसून येतात,
ज्यात आपण गुंतून राहतो. विशेष म्हणजे "मी" ह्या संकल्पनेवरून खूप
साऱ्या काल्पनिक तात्पुरत्या इमारती रचल्या जातात...इतके आपण घट्ट त्या
"मी" ह्या अनुभवाला पकडून राहतो. "मी" कल्पना असो किंवा नसो,
अस्तित्व राहणारच. म्हणून "मी", त्या अर्थाने खोटा
ठरतो (म्हणजे सत्य किंवा शुद्ध नाही). एकदा हे ओळखले की सर्व अस्तित्वातील घडामोडी
पलीकडून येतात, हे आपण स्वीकारायला लागतो.
खोटं असणे, म्हणजे सूक्ष्म व्हायला वाव स्वतःला देणे. प्रारब्ध
कसेही असले, तरी शांतीने सामोरे जाणे.
हरि ओम
Shree
_Appropriate_ interval of space and form is
required for making _sense_ of movement of any kind - be that of life, changes,
action, thoughts, feelings, people, concepts.... anything.
If this interval is reduced, the meaning (for self) of
movement changes. If the interval can increase, then movement seems to get
diluted in space itself. So space becomes the ultimate reality and forms become
something temporal.
The collapse of this interval (witnessed in current
times) seems to completely make meaning obsolete or senseless. This means that
the interval of space leads to the meaning of forms. Ofcourse that does not
mean one should only concentrate on space. But acknowledge that forms come from
space itself, so spatial presence, silence, light, connections (which are
intuitive) are foundations of form making.
Hari Om.
श्री
_आपण_ ही संकल्पना जो
पर्यंत प्रज्वलित असते अस्तित्वात, तो पर्यंत भाव,
संबंध, क्रिया, स्मरण,
परिणाम त्या प्रकारे होत राहतो. आपण पहिल्यापासूनच विघटित अनुभव घेत राहतो
(अनुभव म्हणजेच विघटन एका प्रकारे), म्हणून येणारे
दृश्याशी संबंध निर्माण होतात. This represents our imagination
currently.
इथून सुरुवात करून स्थिर, सूक्ष्म,
विशाल होण्याचा प्रवास असतो प्रत्येकाचा. कुठल्याही "क्षणी",
आपल्याला असंख्य निरनिराळे प्रवाह जाणवत असतात. प्रत्येक प्रवाहाशी गुंतायला
हवे, असे काहीही नाही. तो प्रवाह असल्यामुळे,
तो येणार (जे काही असेल ते) आणि जाणार (जे काही होईल ते) आणि असे चक्र चालू
राहणार. आपल्या अनुभवात असणार महत्वाचा घटक आहे हा. त्याला सामोरे जाणे भाग आहे.
आपण कार्य करावे. प्रवाहाचा परिणाम काय होईल ते भगवंत जाणतो आणि तो त्या
प्रमाणे आपल्याला देतो. _फळावर_ निर्भर राहू नये. म्हणजेच की पूर्ण क्रिया जी फळावर
कारण होण्याची संकल्पना आपण मांडू इच्छितो - स्थिती, स्तर,
संबंध, भाव, चक्र - त्यावर शंका
घेऊ नये किंव्हा ताबा मिळवण्याचा अट्टाहास ध्यानी आणू नये. दुसऱ्या अर्थी ह्या _क्रियेवर सिद्ध
असण्याची संकल्पना मांडू नये_. म्हणजेच अस्तित्व
भाव हा क्रियेच्याही अधिक सूक्ष्म असतो आणि सर्व प्रकट होऊ देण्याचा _मूळ कारण_
ठरतो. इथे _कारण_ ह्या शब्दाला शुद्ध भावाचा रंग आहे.
भीती म्हणजे एक प्रकारे अस्तित्वाच्या कार्यावर श्रद्धा नसणे आणि त्यामुळे
सर्व क्रियेवर ताबा मिळवण्याची धडपड करत राहणे. तो अट्टाहास नमवायला हवा,
श्रद्धा भाव वाढवायला हवा.
लक्ष द्या की आपण नेमकं काय करत असतो अस्तित्वात. प्रकरण फक्त परिस्थितीशी
सामना करण्याचं नाही आहे. त्याहीपेक्षा अस्तित्वात शांती भाव कसे आत्मसात होऊ शकेल,
हे आहे.
हरि ओम.
Shree
I is a form of awareness of existence. This awareness
creates a wholistic 'action' of becoming from subtle to gross states that have
various components of vibrations, thoughts, feelings, forms within it.
What _triggers_ this becoming? This is the Force itself
trying to understand Itself. The triggering creates different "memory
states" that make it impossible to imagine what is "previous or
higher or subtle"? Therefore " we" get "locked" into a
memory state and the entire effort is to go beyond this state. The Force trying
to outwit the protected illusionary self. Herein is the "struggle"
that gets felt.
I don't know why this is inherited. Therefore this is
referred as God's Will to "experience" life. And this is the path
intended to realize the Truth of existence.
Hari Om.
श्री
आपण नेहमी खूप स्तरात गुंतले गेलेलो असतो आणि त्यातून अनेक रूप,
आकार, बदल अश्या क्रिया अनुभवात येत राहतात. ह्याचा अर्थ
असा की कुठल्याही प्रश्नाचे किंव्हा समस्याचे बीज सर्वांगीण पसरले गेलेले असते.
म्हणून कार्य सर्वांगीण असायला हवे आणि तसा योग्य परिणाम व्हायला हवा.
आजकालची मुलं खूप मोबाईल मध्ये गुंतले गेलेले असतात आणि ते नेहमी गोंधळात
असतात - असा उद्गार करून बरोबर ठरत नाही. ही समस्या सर्वांगीण आहे,
आणि त्यांचे गुंतणे मोबाईलवर केंद्रित का झाले असावे हा गहन विचार आहे.
अध्यात्माच्या पातळीवर सांगायचे झाले तर मन कशातही गुंतून घेऊ शकत आणि तसे
संस्कार आत नेतं. मोबाईलची खूप गरज मनाला भासते म्हणून ते तिथे गुंतून राहते,
त्याच्यावरून प्रश्न निर्माण करते, तसेच उत्तर शोधत
राहते आणि त्या चक्रात वावरत राहते. वास्तविक मोबाईल हे निमित्त आहे. त्याचा
परिणाम मनाने स्वतःवर करून घेतला आहे. तो परिणाम सर्वांगीण असतो,
म्हणून त्याचे पडसाद समाजावर उमटतात.
मोबाईलवरून लक्ष सूक्ष्म स्थितीत आणायला लागते, म्हणजेच सध्याच्या
स्थळाशी आणि काळाशी संबंध. त्यातून अधिक सूक्ष्म होऊन भावनाकडे,
जाणिवाकडे लक्ष केंद्रित करायला लागत. सर्वात शेवटी पूर्ण विलीन होऊन ते
भगवतस्वरूप होऊ शकतं.
ह्याचा अर्थ मन अधिकाधिक सूक्ष्म होऊन भगवंताच्या शक्तीचे संस्कार आत्मसात
करून घेऊ शकतं. त्यासाठी खरी तळमळ हवी. तळमळीतून शुद्धताकडे,
त्या गुंतण्यात मन रममाण होऊ शकतं. सध्या तळमळ विषयाची आहे. तीच भगवंताची आणली,
तर मन तिथेच स्थिर होऊ शकेल
हरि ओम.
श्री
विचार येत गेले तरीही नामस्मरण करत राहावे, त्या शक्तीची आठवण
ठेवत राहावी, कुठल्याही रूपाने ती करता आली तरीही.
विचार, हे "मी" ह्याच्या मध्ये गुंतून
राहिल्यामुळे येत राहतात आणि त्यात "गुंतून" राहण्याची क्रिया होते. मग
त्यात प्रश्न, चक्र, भाव,
दुहेरी परिणाम, साखळी, स्तर,
प्रवाह - अशा गोष्टी "जाणवत" राहतात.
त्याला मी कोडी किंव्हा विषयासारखे बघून नाही चालत किंव्हा त्यात गुंतल्यामुळे
अपुरेपण, वेगळेपण, भीती,
बेचैनी, कष्टी, त्रासिक - अश्या
साऱ्या भावनेत "गुंतून" चालते का? हे चक्र असल्यामुळे,
ह्याची चावी भगवंताकडे असते, माझ्या जीवाच्या
जाणिवेत असते का? म्हणून भगवंत शक्तीला शरण जाणे येते.
शरण जाणे ही क्रिया शिकायला लागते. एकदा त्यात आपण स्थिर झालो की ते कार्य
होते. सत्संगतीचे महत्व त्यासाठी आहे. संकल्पने पासून ते परिमाण पर्यंत ते स्मरण
ते पुन्हा संकल्पना - हे चक्र असते शक्तीचे कार्य म्हणजे. त्यातूनच गुंतून राहणे
होते. कुठे गुंतुन राहावे आणि स्वतःवर प्रभाव पाडून घ्यायचा आहे ते ठरवावे - कारण
त्या निश्चयावर परिणाम निर्भर होतो.
नामात गुंतून राहिले, तर त्या प्रमाणे परिणाम निश्चित होतो.
हरि ओम.
श्री
_स्मरण_ चक्र आणि कार्य आहे.
त्यातून गोष्टी "ध्यानात" येतात, वावरतात आणि निघून
जातात. एकंदरीत आपण स्थळ आणि काळात _जगतो_
असे वाटते.
आठवणीत राहणे ही गूढ क्रिया आहे. ती अनेक जन्म चालून आलेली,
पलीकडून येत असते, संबंधित राहते आणि नंतरही बरोबर येत राहते.
प्रश्न आत्ताचा नसतो किंव्हा नंतरचाही. प्रश्न असतो. त्याला शांत होण्यासाठी
मार्ग पत्करायला लागतो. शांतीचे उत्तर क्षणात नाही, साखळीत नाही,
भावात नाही, नंतर नाही, आत्ता नाही,
परिस्थितीत नाही, विचारात नाही, भावनेत नाही,
स्थितीत नाही, रुपात नाही, संकल्पनेत नाही.
_नाही_ ह्याचा अर्थ शरण
जाणे आहे. म्हणजे भगवंताचे अस्तित्व "स्वीकारणे" आहे. त्याच्या कार्याची
जाणीव प्रज्वलित ठेवणे आहे.
हरि ओम.
श्री
नामस्मरण, त्याचा होणारा परिणाम (जो विचारांच्याही अधिक सूक्ष्म
आणि निराळ्या स्वभावाचा होत असेल) तो होतोच. म्हणून दृश्यात वावरत राहताना
नामस्मरण नेहमी करत राहावे.
दृश्याचा परिणाम होतो किंव्हा तसं आपलं मन करून घेतं. म्हणून मनाचे स्थान
अस्तित्वात खूप महत्वाचे असते. मन शुद्ध केलं की भगवंताचे दर्शन,
त्याच्या कार्याची प्रचिती होते. थोडक्यात दृश्याला आपणच मुल्य देतो आणि त्या
प्रमाणे गुंतून राहतो, विषय बघतो, क्रिया करतो,
परिणाम भोगतो, स्मरण ठेवतो वगैरे.
आपण जे जगतो (अनुभवतो), ती दृश्य स्थिती म्हणायची. तीही परिवर्तित होऊ शकते.
त्यासाठी कार्यावर स्थिर निष्ठा हवी.
शब्दाचे किंव्हा तात्पुरत्या समस्यांचे स्पष्टीकरणात किंव्हा ते सोडवण्यात
विशेष वेळ घालवू नये. हालचाली जोरात होतात किंव्हा हळू,
त्यानेही विशेष व्याकुळ होण्याची गरज नसते. हालचालींचे उगम शांत शक्तीतून होते,
आपण निमित्त ठरतो. म्हणून माझ्या "निर्णयानी" जगाचा उध्दार होत नसतो
, तो माझ्यावर होणार असतो. म्हणून निर्णयाचा
"परिणाम" स्वतःवर होतो, हे विसरू नये.
हरि ओम.
श्री
कुणाचेही कोणापासून अडत नाही. हे सत्य आहे, कारण जीव
अस्तित्वाच्या कार्यातील एक घटक असतो. म्हणून कार्याची भूमिका त्यावरून प्रस्थापित
होते. म्हणजे दृश्य होणार, वावरणार, विलीन होणार - हे
चक्र - कायम असणार. तशी भगवंताचीच इच्छा आहे.
कार्य हा भाव विचार आणि भावनाच्याही पलीकडे असते. म्हणजे विचारांच्या आणि
भावनांच्या मर्यादांच्या पलीकडे होणे, आपले ध्येय आहे
किंव्हा हिताचे आहे. तसे होण्यासाठी नामस्मरण करत राहणे जरुरीचे आहे. नामस्मरणाचा
परिणाम आकलनाच्या पलीकडे होतो, म्हणून त्याच्यावर
खूप श्रद्धा ठेवावी. श्रद्धा भावही सगळ्या हेतूच्या पलीकडे स्थित असते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home