Saturday, January 17, 2026

श्री

 श्री 


दृश्यात पदार्पण केलं की भगवंताच्या शक्तीला ते गुण आले. म्हणजे शक्तीमुळे _हालचाली_ होणार, व्यवहार होणार, स्मरण होणार, परिणाम होणार, अनुभव येणार, विचार चक्र आणि भावना चक्र येणार. ह्या सारे क्रियाना हालचालीत ठेवणारे गुणांना _प्रकृती_ म्हणतात. शांत कायम अस्तित्व आणि प्रकृती, असे दोन भाग अस्तित्वाचे असतात आणि दोघांचे स्मरण किंव्हा जाणिवा, स्वभाव, परिणाम, अनुभव वेगवेगळा होतो आपल्यावर. दोघांमध्ये संबंध असतो, पण तो _गूढ_ असतो, आपल्या पार्श्वभूमीवरून....म्हणून शांत होण्यास प्रयास लागतात. हा मार्ग आपल्या वाटेला आहे, तर त्याला सामोरे जाणे आले. 

एखादा विचार खूप सारे विचारांच्या स्थितीचे बरोबरीने गुंडाळी घेऊन येतो. हे असते त्या विचार शक्तीचे कार्य. म्हणून नामस्मरणाचा विचार योग्य विचारांची साखळी बरोबरीने घेऊन येईल आणि सर्व ठिकाणी पसरेल. 

संबंध होणे हा अस्तित्वाचा गुण आहे म्हणजे चक्र कायम राहते. कुठलं चक्र संपादन करावे, हे विवेक बुद्धीने ठरवावे. सूचित आहे, की नामस्मरणाचे चक्र संपादन करावे. परिणाम योग्य होईल.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home