Friday, January 16, 2026

श्री

 

श्री 

 

सत्याकडचा प्रवास अनाकलनीय समजावा. तो कुठेही, कुठल्याही रूपाचे अनुभव संक्रांत करेल. ते सर्व स्वीकारावे. स्वीकारणे म्हणजे उपकार असत नाही कुणावर....ते आपल्या हितासाठीच आहे, हे ओळखावे. 

 

मग त्या प्रवासात विघटन येईल, एकत्रीकरण येईल, संबंध येईल, क्लिष्टपणा येईल, स्वतःची टीका येईल, स्वतःवर प्रेम येईल, नाकारणे येईल, स्वीकारणे येईल, गोल गोल सगळीकडे फिरणे येईल, शंका येईल, व्याकुळता येईल, बदल येईल, परावलंबन येईल, एकटेपणा येईल, सर्वांगीण चिंतन येईल, प्रयत्न येईल.....ह्याला शोध म्हणावा.

 

वरील प्रवास कठीण असतो, म्हणून तो घेऊ नये, असे विधान फसवे होते. सोप्पा की कठीण, ह्याने निर्णय आधारित करू नये. मार्ग घ्यायचा आहे. तेवढेच बघावे आणि कार्य करावे. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

असणे किंव्हा आकार घेणे, दृश्यात येणे म्हणजे मर्यादा येणे, गतिमान होणे, विघटित होणे, तात्पुरते असणे, वेगळे वाटणे, चक्रात राहणे, तसे स्मरण धरणे वगैरे. त्या प्रकारे मनाची धारणा होते. मनाने दाखवलेल्या मार्गावरून गेलो तर समाधान तिथे संपादन होईल का, हे ओळखावे. दृश्यात राहताना मिळणारा मार्ग तो अस्थिर असतो. 

 

अध्यात्माचा मार्ग पलीकडे होण्यासाठीचा असतो. म्हणून तो मार्ग पत्करावा. त्या मार्गाचे महत्व सुरुवातीला खूप पुसट असावे आणि शंका येत राहील की तो का पत्करावा? त्या मार्गावर सतत जात राहिलो, की त्याचे महत्त्व पटेल आणि निरहेतू प्रेम त्यावर स्थित होईल. थोडक्यात अशा मार्गावर सैय्यम, चिकाटी, प्रयत्न आणि श्रद्धा ठेवावी. शांतीचे कार्य त्यातून आत्मसात होईल.

 

हरि ओम.

 

 

 

श्री 

 

रिकामे असणे महत्वाचे आहे. म्हणजे त्यातून सर्व काही आपण स्वीकारण्याची आणि देत राहण्याची भूमिका धारण करतो. रिकामे म्हणजे स्मरणही अगदी सोप्पे असावे आणि स्वच्छ. 

 

रिकामे होण्यासाठी एक एक "वस्तू" ज्यावर आपला जीव अवलंबून केला गेला असतो, ती वजा करावी. बुद्धीने वजा होते का, की तो प्रकार गूढ आहे?! सर्वांगीण चिंतन करत गेल्याने त्या वास्तूचे मुल्य विलीन होते आणि तिची जागा आणखीन सूक्ष्म रूप व्यापून घेते. असे करत करत शेवटी सत्य माध्यम स्थित होते. म्हणजे "मी" पूर्ण रिकामा होतो आणि तीच जागा भगवंत घेतो.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

संबंधित राहणे, हा शब्द जीवाच्या पार्श्वभूमीवरून जाणवतो. परावलंबन, अवलंबून असणे, स्तर, स्थिती, क्रिया, चक्र, परिणाम, भाव - हे सारे घटक संबंधित ठेवतात जीवाला. जीव आणि संबंध एकच म्हणायला हरकत नाही. 

 

साहजिकच त्यामुळे वासना, विचार, भावना, अनुभव आणि त्यांच्या स्थानांबद्दल प्रश्न उद्भवणारच. "मी होणे", हा प्रकार नेमका काय आहे आणि त्यातून असे भावना का निर्माण होत राहतात?! गूढ प्रश्न आहे. हा प्रश्न मला का पडावा?! _इतरांना तो पडत नाही का, इतर व्याकुळ होत नाही का, इतर त्यांच्या धुंधीतच राहतात का, इतरांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही का?..._

 

आपणच एवढे व्याकुळ का होत राहतो आणि आपल्याला उत्तर मिळाल्याशिवाय बेचैनी का वाटत राहते? हा प्रश्न मला लहानपणा पासून आहे. तेव्हा शब्दात मांडता येत नसे आणि असे वाटे की खूप माहिती गोळा झाली, अनुभव आले, की ह्या बेचैनीचे उत्तर मिळेल. तर तसे काही तंतोतंत झाले नाही. 

 

सध्या (काही वर्षां पासून) असे वाटायला लागले आहे, की बाहेरून उत्तरे मिळवणे ह्यातून मर्यादित गोष्टी समजून येतात...त्यांनी पूर्णतः बेचैनी जात नाही. म्हणजे ती खूप खोल आणि सूक्ष्म ठिकाण्यातून प्रकट होत असावी. _ती का ध्यानात येऊ पाहते?_ ह्याचे उत्तर खरंच माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. 

 

संत सुचवतात की प्रश्न सर्व भगवंताच्या शक्तीला अर्पण करावे. त्याच्यावर श्रद्धा ठेवणे. हे शिकणे आहे. एका दिवसात ह्याचे उत्तर सामावलेले नसावे निश्चित. लोकं येतील आणि जातील, पर्यावरण असेल आणि बदलेल, हालचाली असतील आणि जातील...असे दिसत आहे की ह्या हालचालींवर आपण आपला जीव गुंतवून ठेवू नये, त्यात स्वतःचा सिद्धपणा अवलंबून ठेवू नये. तरीही हे दिसते तेवढे सरळ नाही, असे वाटत आहे. अनेक प्रयत्न, अनेक संकल्पना (त्याग, आपुलकी, शरण, श्रद्धा, सैय्यम, कृपा) असे आत्मसात होणे गरजेचे आहे आणि त्यातील एकही बळजबरीने करता येत नाही....

 

म्हणून मार्ग गूढ आहे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

भगवंताचे नाम घेणे, असे का करावे?....

 

त्यातील एक उल्लेख असा केला जातो की "पाप" टळेल. हा अर्थ गूढ आहे किंव्हा आध्यात्मिक आहे. ह्या अर्थाचे जरा आपण स्पष्टीकरण बघू...

 

वासनेतून साखळीचे उगम होते आणि स्मरण. त्या घटकां मध्ये विचार आणि भावनांचे उगम होत राहते. हे विघटित प्रकरण आहे. त्याचा अर्थ की ह्या क्रियेचा परिणाम होतो, गुंतून राहतो आपण, धुंधीत असतो आपण, विषय ध्यानी येतात, धडपड सुरू होते, क्रिया होते, हालचाली जाणवत राहतात, परावलंबित अवस्था होते वगैरे. "मी" हा भाव उदयास येतो आणि प्रज्वलित राहतो.  

 

त्यात अनेक वृत्ती असतात जे आपल्याला "प्रतिक्रिया" द्यायला भाग पाडतात. सर्व प्रतिक्रियांच्या मुळाशी स्वार्थ लपला असतो, किंव्हा दृश्य बद्दल खूप आसक्ती. म्हणजे त्यातून राग, लोभ, बेचैनी, त्रास, कष्ट, न्यूनपणा, वगैरे भावनांचे उत्तरे काहीतरी _क्रियेच्या मार्गातून व्यक्त_ आपण करतो. _Violence_ within _causes_ _movements_ outside and those affect us _internally_ again. 

 

वरील स्वभावाला "पाप" असे म्हणतात - the _method_ of expression that _leads_ to violence inside and outside. 

 

म्हणून नामस्मरणाने असे होणे विलीन होत जाते. The absence of violence (means synthesis of truth) means Bliss. 

 

हरि ओम.

 

 

 

Shree 

 

Expression has two meanings... external and inner. Inner expression is regardless of any circumstances. Whereas external based expression is contextual. Both are connected of course. But what is fundamental, needs to be understood in responding to life and even design. 

 

Critical position of inner forces to have oneself approved by external demands doesn't work. And herein lies the idea of acceptance of the self and making peace with both dimensions, so to say. 

 

It goes without saying that the inner state is far more authentic and fundamental than external circumstances. To articulate inner state may appear quite complex and perhaps is, unnecessary. Inner state doesn't depend on anything and *from it,* dependence emerges to outside phenomenon. That is, the inner state has its own independent place and it's exists without any purpose or reason. This requires *full* acceptance. 

 

Our true identity stems from this inner state. All the systems and logics in the world can't describe it. It requires acceptance without any intent.

 

Hari Om

 

0 Comments:

Post a Comment

<< Home