Saturday, January 17, 2026

श्री

 श्री 


भावना किंव्हा अस्तित्वाची खूण कायम असते. तिचे कार्य सर्व स्तरात होत असते, सूक्ष्म ते स्थूल ते परत सूक्ष्म. कार्य, ही अपौरुष संकल्पना आहे. त्याला प्रकृतीही म्हणू किंव्हा नुसतं कार्य हा शब्द. त्यातून जीव होतो, त्याला अनुभव येतात, विचार आणि भावना येतात, त्याचे स्वभाव येतात बरोबरीने, परिणाम होतो, मनोरचना येते, परावलंबन जाणवते, अस्थिर वाटते, तात्पुरते वाटते वगैरे. स्मरण बदलते आणि त्या स्थितीच्या अनुश्रूंगाने तसे स्मरण प्रज्वलित राहते - म्हणजे "मी". 

ह्या साऱ्या गोष्टींचे दोन परिणाम होत राहतात - एक की विघटित वाटत राहणे हा भाव आणि त्यामुळे सिद्ध होऊ पाहण्याची धडपड करत राहणे. विघटित वाटणे त्यातून आपण विषय करतो, दोष देतो, शंका घेतो, प्रतिक्रिया करतो वगैरे.

 दुसरा परिणाम की ह्यातून शांतीकडे प्रवास नेण्याचा निश्चय होणे. म्हणजे खूप आतून हे जाणवते की सारा प्रकार संबंधित आणि एकत्र होण्यासाठी आतुर आहे. म्हणजे स्पर्धा, वेगाने एकटाच पुढे जाणे, दुसऱ्यांची फिकीर न करणे - ह्या संकल्पनांना मर्यादा असतात हे जाणवणे आणि तसे करणे भल्याचे नसते. म्हणून शोध शांती भावाचा सुरू होतो आणि त्याच्यातून वेगळ्या पद्धतीचे अनुभव संक्रांत होऊ पाहतात. ह्याचा शेवट स्थिरतेत होतो. 

आपण (म्हणजे आतील शक्ती, जिल्हा आत्मा असे संबोधित केले आहे), नेहमी प्रवासात असतो आणि आपल्याला प्रवाहात राहायचे असते. प्रवाह कोणापासून थांबत नाही, त्याचे रूप कसेही सामोरे येते, ते अनंत काळापासून दृश्यात आलेले असते. 

वरील भाव दुसऱ्या पर्यंत मांडणे कदाचित कठीण असावे आणि ते मांडले तर इतर लोकं लगेच त्याला "विषय" करून घेतात...म्हणजे स्वार्थी उपयोगासाठी. 

आपण विषय सोडवायला आलो आहोत का? आपले कर्तृत्व म्हणजे विषय पटापट सोडवणे आहे का? आपण विषयातून सिद्ध होतो का? ह्याचे उत्तर सांगायला हवेच का? स्पष्टीकरण देण्याची गरज असते का? 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home