Saturday, February 28, 2026

Shree

Shree 

 

विचार साहजिकच प्रवाहात असणार आणि ते कुठेही जातील, कसेही संबंध निर्माण करतील, कुणा बरोबरही संपर्क साधतील आणि कुठूनही येतील किंवा रूप घेतील. प्रत्येक घटक्यांवर नियंत्रण ठेवणे हे भीतीपोटी असू नये. नियंत्रण शांती भाव आत्मसात होण्यासाठी करावे. 

 

विचार तर कार्य करायला भाग पाडणारच, ह्यात दुमत नाही. पण एक नजर त्रस्तपणे त्याकडे नुसते बघत रहावे की काय होते आहे, कसे होते आहे, कुठे जात आहे वगैरे. रंग कसे येतात आणि विरघळतात हे बघावे. लाटा कसे होतात. ढग येतात, कार्य करतात पण इथे आकाश हे ही माध्यम आहे, ज्यात हा सर्व ढगांचा कारभार होतोच ना! 

 

म्हणजे हालचाली आणि शांतीचे स्थान, ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात अस्तित्वात. हे दोन्ही छटा आपल्यात असतात आणि त्यांची जाणीव असणे महत्वाचे आहे. 

 

मग हालचालीने का व्याकुळ व्हावे?! 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अंतर्मुख क्रिया, जे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर म्हणजे स्पंदन पर्यंत होणे, वासना, विचार, भावना, देह अशी साखळी अनुभवणे, त्या साखळीचा स्वभाव आणि कार्य आत्मसात होणे आणि सर्व स्वीकारणे. स्वीकारणे म्हणजे सूक्ष्माचे अस्तित्व आणि कार्य जाणवणे. थोडक्यात स्मरण राहणे, जाणीव, कार्य, दैवी इच्छा आणि स्वीकार ही एकच गोष्ट असते. 

 

आपण जीव आहोत. आपल्या रूपातून मार्ग निर्माण करायला लागतो. म्हणून अनुभव, संकल्पना, भाव, स्मरण, कार्य, जाणीव ह्यांचे स्थान स्थित असते. हे सारे हालचाली दर्शवतात, संबंध जोडतात, परिणाम करतात, भाव देतात, सिद्ध होण्यास भाग पाडतात. 

 

कुठलाही माणूस अपुरा असतो, अस्थिर असतो, हेतू बाळगतो. साहजिकच त्यातून आयुष्याचे अनुभव येत राहतात. तसे असू द्यावे, कारण हे विधिलिखित असते. ह्याला एका अर्थी बहिर्मुखपणा किंव्हा परावलंबन म्हणू. मार्ग तो असतो, ज्यातून अंतर्मुख होतो माणूस आणि जुनी मनोरचना बदलते. त्यासाठी प्रयास करावे आणि श्रद्धा वाढवावी.

 

हरि ओम.

 

 

 

श्री 

 

सकाळी लिहिणे ह्यांनी काहीतरी आत परिणाम होत असेलच. विचार मांडावे आणि श्रद्धा असावी की त्याचा खोलवर परिणाम होईल. तो परिणाम सर्व स्थळ, काळ, क्रियेत योग्य प्रमाणात उमटतो आणि योग्य प्रश्न निर्माण करतो आणि उत्तर शोधण्यास परावृत्त करतो. 

 

परिणाम दैवी इच्छा आहे. म्हणून मर्यादेच्या पलीकडे होत राहणे, ही देखील त्याच्या इच्छेची खूण आहे आणि त्यालाच योग्य परिणाम मानावे. तो गूढ असतो, रूप आणि आकार अगोदर सांगता येणे कठीण आणि ते सर्वस्वी भगवंतावर सोपवावे श्रद्धेने. तो परिणाम कुठे नेण्यासाठी परावृत्त करेल, काय दाखवेल, कधी दाखवेल, कसे दाखवेल हे सर्वस्वी भगवंतावर सोपवावे.

 

हरि ओम.

 

 

Shree 

 

Philosophical questions occur herein....those of meaning, existence, flows, connections, authenticity, patterns, inner states, justifications, preferences, supports, validations, respect, empathy, choice, struggle, patience, search, acceptance, doubt, waiting, perseverance, beyondness and so on. 

 

The vibrations of existence create these questions and are perceived through memory and prompting action and relationships. 

 

This is Action. And this is all ok, for there becomes a conduit to manifest this Action. 

 

Hari Om.

 

 

Shree 

 

Things happen everywhere simultaneously and they are linked and return and diverge. Time. Silence isn't a waste of time nor is action any noise. Relationships aren't any distractions and nor is the need for solitude. There isn't a binary.

 

Hari Om

 

 

Shree 

 

What _is_ really there in motion or memory?!!.. If I look at 'it', it looks back at me again and then a process of give and take occurs!...or some sort of exchange and the inquiry would be.....was something really there!!? So it's an illusion in a way and motion in another way. 

 

I only decide something and the cycle begins on its own. Rather the cycle has begun a long time ago, even before I came into being and even after I go away or dissolve or whatever, the cycle will remain!!

 

Hari Om.

 

 

Shree 

 

A court scale or some geometrical notion of boundary is required to feel _contended_ and connected and offer a 'sense or measure of change' in an otherwise boundryless existence.

 

A human needs to feel a boundary to generate or realize above feelings, else he/ she may feel lost. 

 

From a changing desert of sand dunes or icescapes or oceans, when one arrives, the natural crests, troughs, trees, valleys, rivers, lakes, depressions, courts, planes give some boundaries to feel. Maybe architecture is an art of feeling a boundary. Home making or belonging or place making or anchored feelings may also be considered as actions of boundary creation. 

 

We create a boundary to go beyond or a frame to measure a movement of change that takes place through the boundary and beyond the boundary.

 

In today's world, what then, is a boundary? 

 

Previously the progression of thoughts was supposed to be linear, web like or spiral with superimpositions of age, changes, genders, complexity to _refine_ and realize the fundamentals and finally realize a state of tranquility. It may be similar to climbing a mountain. 

 

However, I feel that in today's Times, such a progression of thoughts is difficult to take place...whether be that linear or spiral or web like. The thought pattern is an encounter of a "storm" that refuses to apply mental skills for generating any linear or spiral or web patterns. In this scenario, I think, it would be wise to consider the action of "settlement" of the thoughts. That would be the idea of boundary nowadays. 

 

Hari Om.

 

 

श्री 

 

अस्तित्वात होणाऱ्या सगळ्या घडामोडी, बदल, संबंध, प्रवाह तो भगवंताच्या शक्तीमुळे असतो. शक्ती म्हणजे स्पंदने, जिच्यात वासना, विचार, भावना, देह अशा गोष्टी प्रकट होतात आणि अनुभव निर्माण करतात, स्मरण देतात, भाव देतात. 

 

बदल हे होणार, कारण ते अस्तित्व शक्तीचे प्रतीक आहे. त्या शक्तीला वासना, विचार, भावना, अनुभव, जाणीव असे सारे घटक किंव्हा छटा आहेत. म्हणजे हे संपूर्ण कार्य स्तराच्या वावरण्याच्या शक्तीमुळे होत असते आणि त्यामुळे आपणही घडतो, येतो आणि जातो आणि हे चक्र सुरू राहत. 

 

क्षण येतो आणि जातो. बिंदू दिसणे हा प्रवाहाचा परिणाम म्हणायला हरकत नाही....की ते येईल आणि बदलत राहील आणि जाईल. किंबहुना रूप आणि आकार बदलण्याच्या भूमिका घेतील पण त्यांच्यातील आत असणारे माध्यम स्थिर असते. आत आपण स्थिर असतो आणि बाहेर आपण रूप (स्वभाव) आणि आकार (देह) म्हणून वावरतो. 

 

चिंता, काळजी ही आतून येते, तिला बाहेरची परिस्थिती किंव्हा कुठल्याही द्वैत वस्तूचा आधार नसतो. म्हणून कुणामुळे किंव्हा कशामुळे काय घडले, ह्यात गुंतून हिताचे ठरत नाही. Don't imagine fixing things, for they are only a reflection of existence. 

 

सर्व प्रवाह असणार आहे, म्हणजे अनुभव परिवर्तन होऊन स्थिरतेकडे स्थित होतो किंव्हा नदी समुद्राला जाऊन मिळते किंव्हा रूपांतर होते. भगवंताच्या उदाहरणात दोन अंगाने वर्णन आढळून येतात : एक म्हणजे कुठल्याही क्षणाचे स्वरूप - गोष्टी येतील आणि जातील आणि तसे ओळखावे (प्रवाह); दुसरे म्हणजे प्रवास, ज्यात आपण भगवंताच्या जवळ जात राहतो किंव्हा जशी नदी समुद्राशी एकरूप होते. 

 

हे दोन्ही अंग घडायला दिलेली किल्ली म्हणजे श्रद्धा.

 

हरि ओम.

 


0 Comments:

Post a Comment

<< Home