Friday, March 06, 2026

श्री

 श्री 


रूप, स्मरण - ह्यांच्या _हालचाली_ असतात. हालचाली स्थित होणे आणि त्याचे कार्य काय असते आणि कसे होते, हे संपूर्ण भगवंताच्या शक्तीमुळे प्रस्थापित होते. त्याला विघटन, स्तर, चक्र, वासना, साखळी, प्रकृती, गुण असे निरनिराळे नावे दिलेली आहेत ज्यांच्यामुळे "आपण" हा भाव होतो आणि व्यवहार करतो. 

थोडक्यात जीवाचा भाव बहिर्मुख असतो आणि दृश्याच्या अनुभवाशी संपर्कात येतो. त्यामुळे होणारे परिणाम, विचार चक्र, भावना चक्र, भोग, वगैरे..

आपल्यासाठी भगवंताचे अस्तित्व स्वतःच्या अनुभवातून ओळखायचे असते. ते अस्तित्व एकदा ध्यानी येऊ घातले, की शांती रस स्थित होते, समाधान प्राप्त होते. हा विषय नाही, किंव्हा पळवाट नाही प्रपंचातून. प्रपंचाचा स्वभाव काय आहे, हे जाणून घेण्याचे माध्यम आहे. प्रपंच कोण करतो आणि त्यात माझा काय संबंध - ह्या प्रश्नांचा समाधानकारक उत्तरांचा शोध असतो. शोध होणे स्वतःच्या अस्तित्वाचा, हे जीवाच्या शक्तीतच रुजलेले असते म्हणून तसे अनुभवाचे स्वरूप असते ज्यात सगळ्यांना सामोरे जायला लागते आणि प्रत्येक क्षण स्वीकारावे लागतो.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home