श्री
श्री
काही विचार...
सर्व सत्य विचारांपासून सुरुवात व्हायला लागते असे नाही. म्हणजे बऱ्याच रूपातून जाणीव शुद्ध होऊ शकते. फक्त त्याला विचाराची जोड मिळाली की त्यात संबंध, कार्य भाव, प्रयास, सैय्यम, श्रद्धा, विघटन, चक्राच्या सरुपाची जाणीव, बदल, परिणाम, भोग, सामोरे जाणे, शरण जाणे, स्वीकारणे - अशा गोष्टी ध्यानात येऊ शकतात. म्हणून त्या अर्थी विचार महत्वाचा, म्हणजे अनुभवांना योग्य दिशा मिळू शकते (thoughts need to be complimentary or supporting to the realization of Truth).
त्या अर्थाने शंका किंव्हा प्रश्न ध्यानात येणे ह्याचे योग्य स्थान असते. विचार आणि शंका नको, असे म्हणणे वेडेपणा असते. फक्त शंकेने व्याकुळ होण्याची गरज नाही किंव्हा तात्पुरते व्याकुळ झाल्यावर, जो शोध होऊ पाहतो, त्यातून श्रद्धा भाव आणि शांती मध्ये परिवर्तित होणे गरजेचे आहे आणि जेवढा जास्ती जास्त शांती भावात स्थित होऊ शकू, तितके हिताचे ठरते. त्या अर्थाने सर्व अनुभव स्वीकारावे. स्वीकार त्वरित होईल की नाही, हे सांगणे अवघड असते. स्वीकार होण्यासाठीचा मार्ग असा की कर्तव्य करावे, श्रद्धा वाढवणे. कधी कधी कटू क्षण स्वीकार करायला वेळ लागू शकतो, म्हणून सैय्यम ठेवावा. सैय्यम वाढवायला नामाचे सतत चिंतन कायम ठेवावे. कायम. काहीही झालं तरी नाम घेणे सोडू नये. परिस्थिती बदलतच असते. प्रारब्ध असते अनुभवात. प्रारब्ध म्हणजे प्रकृतीच्या परिणामांना सामोरे जात राहणे. त्यात स्थिर राहणे अत्यंत गरजेचे असते. ह्यात दुमत नाही.
विचारातून अस्तित्वाची व्याख्या आणि भावना स्थित होतात. देह भाव आणि भावना (तात्पुरतेपण, भीती, चिंता, कष्ट) अशा प्रकट होत राहतात. नजर मर्यादित राहते. अंतर्मुख होताना तोच भाव आत्मस्वरूपाचा होतो, सर्वांगीण होतो, सूक्ष्म होतो आणि म्हणून भावनेत परिवर्तन होत शांती भाव प्रस्थापित होते, स्मरण विलीन होते, अदृश्य माध्यमात स्थित व्हायला होते.
हरि ओम.
श्री
भावनेने गोष्टी कळतात. भावना एक रूप असते. कदाचित सर्व साखळीच्या कार्यातून, रूपातून, वृत्ती प्रामुख्याने भावनेला धरून राहते. त्यातून संबंधांचे स्वरूप, अपेक्षा, मर्यादा, भोग, परिणाम अशा गोष्टी झेलायला लागतात. मग हे टाळता येते का? जे चक्र भावना निर्माण करते, ते थांबवता येते का?..
माझ्या मते, प्रत्येक रूपाचे स्थान असते, आतील सर्व गोष्टींचे स्थान असते ज्यामुळे मी होतो. स्थान असते, म्हणजे तक्रार न करून घेता, जे आहे ते स्वीकारणे आणि देत रहाणे. हे सुद्धा सिद्ध होण्यासाठी नाही, तर शांती भाव प्रस्थापित होऊ देणे. सर्व देण्याने शांती भाव गवसत असेल, तर तसे का होऊ देऊ नये?!
हरि ओम.
श्री
अंतर्मुख होण्याचे मार्ग विविध असावेत. ते सांगता येतील असेही नाही. पण ते सांगितले नाही, तरी ती प्रक्रिया होऊ देण्याची परवानगी स्वतःला द्यावी लागते निश्चित.
अंतर्मुख होण्यासाठी स्वतःवर खूप श्रद्धा ठेवावी लागते, म्हणजे त्या ओघाने परिस्थितीवर, अस्तित्वाच्या कार्यावर. आपण कोण आहोत, ह्या प्रश्नावर श्रद्धा ठेवत, कर्तव्य करत राहायला लागते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home